himachal pradesh crisis speaker kuldeep singh pathania verdict on 6 rebel congress mlas marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Himachal Pradesh Political Crisis : राज्यसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh politics) राजकीय घडामोडीला वेग आलाय. राज्यसभा निवडणुकीमध्ये व्हीप नाकारुन पक्षविरोधी मतदान केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया (Himachal Pradesh Assembly Speaker Kuldeep Singh Pathania )  यांच्याकडे याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर त्यांनी व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आयाराम-गयारामांची गय करणार नाही, असंही विधानसभा अध्यक्षांनी राज्यातील आमदारांना ठणकावलं आहे. 

दहव्या सूचीनुसार पक्षांतरबंदी कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवलं. त्याशिवाय व्हीप नाकारणाऱ्या सहा आमदारांना अपात्र करताना विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी इतरांनाही सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, “विधानसभामध्ये अर्थसंकल्प पारित करण्यावेळी आमदार उपस्थित नव्हते. त्यांना मी अपात्र घोषीत केले आहे. हे आमदार निवडून एका पार्टीच्या चिन्हावर येतात, अन् दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना मतदान करतात. त्यांच्यावर कारवाई केली आहे. आयाराम-गयारामांची गय करणार नाही.” 

पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई – 

पक्षांतर बंदी कायद्यानुसार 6 आमदारांना अपात्र ठरवल्याचं विधानसभा अध्यक्ष पठानिया यांनी सांगितलं. या आमदारांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढली होती, मात्र त्यांनी पक्षाचा व्हिप पाळला नाही. त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं. दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून मी ही कारवाई केली, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

सहा आमदार अपत्र

काँग्रेसच्या याचिकेनंतर विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवलं. यामध्ये  धर्मशालाचे आमदार सुधीर शर्मा (Sudhir Sharma), सुजानपूरचे आमदार राजेंद्र राणा (Rajendra Rana) , कुटलैहडचे आमदार देवेंद्र भुट्टो (Devendra Bhutto), गगरेटचे आमदार विधायक चैतन्य शर्मा (Chaitanya Sharma), लाहौल स्पीतीचे आमदार रवी ठाकूर (Ravi Thakur) आणि बडसरचे आमदार इंद्र दत्त लखनपाल (Inder Dutt Lakhanpal) यांचा समावेश आहे.



भाजपचे 15 आमदार निलंबित
विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह 15 भाजप आमदारांना निलंबित केले. विपिन परमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, दीप राज, सुरिंदर शौरी, पूरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप ठाकूर, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार आणि रणवीर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. खरे तर, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी सभापतींचा अपमान आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भाजप सदस्यांच्या निलंबनाची मागणी केली होती आणि त्याबाबतचा प्रस्तावही आणला होता.  

हिमाचलमधील पक्षीय बलाबल
एकूण संख्या – 68
काँग्रेस- 40 (6 आमदार अपात्र)
भाजप- 25 (15 आमदारांचं निलंबन)
अपक्ष – 3

आणखी वाचा :

व्हिप डावलून मतदान करणाऱ्या आमदारांना काँग्रेसचा धक्का, हिमाचलमधील 6 आमदार अपात्र!

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts