Gautam Gambhir on Lok Sabha Election 2024 before lok sabha elections gautam gambhir retired from politics for cricket jp nadda marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gautam Gambhir on Lok Sabha Election 2024 : माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची मोठी घोषणा केली आहे. गौतम गंभीर यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. गौतम गंभीर यांनी ट्वीट करत जे. पी. नड्डा यांच्याकडे ही मागणी केली आहे. राजकीय कर्तव्यातून मुक्त केल्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रीय करेन, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणूकीपूर्वी गौतम गंभीर यांचा राजकारणातून संन्यास

भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदरा गौतम गंभीर यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्धार केला आहे. गौतम गंभीर यांना त्यांच्या राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे. गंभीरने एक् मीडिया म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एक्स मीडियावरील पोस्टमध्ये गौतम गंभीर यांनी राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा केली. क्रिकेट राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं गंभीर यांनी सांगितलं आहे.

ट्वीट करत दिली माहिती

गौतम गंभीर हे पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून त्यांनी आता 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीर यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर त्यांनी जोरदार विजय मिळाला होता. 

गौतम गंभीर यांचं ट्वीट

 

पाहा व्हिडीओ : आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची गौतम गंभीर यांची घोषणा!

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts