Lok Sabha Elections 2024 : पीएम मोदी वाराणसीतून रिंगणात, भाजपकडून 195 उमेदवारांची घोषणा; पहिल्या यादीत ओबीसींचा वरचष्मा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पीएम मोदी वाराणसीमधून रिंगणात असतील. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक 29 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी भाजपची पहिली यादी जाहीर केली. 

भाजपने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 80 पैकी 51 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्येला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बासुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत 28 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 

दुसरीकडे, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नावे नाहीत. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये महिला 28, युवक 47, अनुसूचित जाती 28, अनुसूचित जनजाती 18 आणि ओबीसीमधील 57 चेहऱ्यांचा समावेश आहे. 

विनोद तावडेंनी जाहीर केलेल्या जागा 

आज उत्तर प्रदेश-51 
प.बंगाल 27
मध्य प्रदेश 24 
गुजरात 15
राजस्थान 15
केरळ-12
तेलंगणा-9
आसाम-11
झारखंड 11
छत्तीसगड 11
दिल्ली- 5
जम्मू काश्मीर 2
उत्तराखंड 3
अरुणाचल प्रदेश 2
गोवा 1 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts