Pragya Singh Thakur Modi didn’t like my words, I even apologized but Sadhvi Pragya clearly said after rejecting Lok Sabha candidature Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pragya Singh Thakur on Loksabha Election :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (दि.3) जाहीर केली. या यादीतून भाजपने 34 खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे टाळले आहे. त्यामुळे 34 खासदारांचा पत्ता कट झालाय. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचा देखील समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर या अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकल्या आहेत. “मी काही शब्दांचा वापर केला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आवडला नसेल, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी  व्यक्त केली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी भाजपच्या 195 उमेदवारांची घोषणा केली. भोपाळमधून आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने मध्यप्रदेशातील 29 पैकी 24 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. राज्यतील दोन विद्यमान खासदार यावेळी निवडणूक लढवताना दिसणार नाहीत. यामध्ये प्रज्ञा ठाकूर आणि केपी शर्मा यांचा समावेश आहे. केपी शर्मा यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधीया निवडणूक लढवणार आहेत. 

मी 2019 मध्येही उमेदवारी मागितली नव्हती

लोकसभेचं तिकिट नाकारल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, हा संघटनेचा निर्णय आहे. यामध्ये उमेदवारी का दिली नाही आणि कशामुळे देण्यात आली नाही? याचा विचार करायचा नाही. मी 2019 मध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आत्ताही मागितलेली नाही. 

माझे काही शब्द मोदींना आवडले नसतील

पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, मी ज्या शब्दांच वापर केला ते शब्द पीएम मोदींना आवडले नसतील, असे असू शकते. ते म्हणाले होते मला माफ करणार नाही. मात्र, मी त्यांची माफी मागितली होती. माझं खरं बोलणं विरोधकांना आणि काँग्रेसला आवडतं नाही. मी काही बोलले की, त्याच्या फायदा ते मोदींविरोधात बोलण्यासाठी करतात. 

प्रज्ञा ठाकुरांबाबत काय म्हणाले होते पीएम मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर नाराज झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा देशभक्त आहे, असं विधान ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर मोदी म्हणाले होते की, मी प्रज्ञा ठाकूरला याबाबत माफ करु शकणा नाही. गोडसेबाबतच्या वक्तव्यावर प्रज्ञा ठाकूरांनी माफी मागितली आहे, मात्र, मी त्यांना कधीही माफ करु शकणार नाही, असं पीएम मोदी म्हणाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts