Lalu Yadav on PM MODI Modi has no family, he is not a Hindu criticism of Lalu Prasad Yadav Bihar Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lalu Yadav on PM MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत. नरेंद्र मोदी सध्या घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण तुमच्याकडे तर कुटुंबचं नाही आणि तुम्ही हिंदू देखील नाहीत, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केली. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख ‘पलटूराम’ असा केलाय. इंडिया आघाडीने बिहारची राजधानी पटना येथे एका रॅलेचे आयोजन केले होते.यावेळी ते बोलत होते. 

लालू प्रसाद यादव म्हणाले, मोदी हे काय वस्तू आहेत का? ते आजकाल घराणेशाहीवर टीका करत आहेत. लोक कुटुंबासाठी लढत आहेत, असं ते म्हणतात. तुमच्याकडे कुटुंब नाही. जेव्हा एखाद्या हिंदूच्या आईचे निधन होते, तेव्हा हिंदू मुंडन करतो. दाढी देखील काढून टाकतो. तुम्ही सांगा आईचे निधन झाल्यानंतर तुम्ही मुंडन केले का? असा सवाल लालू यादव यांनी पीएम मोदींना केला आहे. राम-रहिम यांच्या मुलांमध्ये तुम्ही द्वेष पसरवत आहात. 

मी फक्त पलटूराम म्हणालो होतो

राजदचे प्रमुख लालू यादव यांनी नितीश कुमार यांच्याबाबत बोलताना म्हटले की, मी त्यांना शिवीगाळ केलेले नाही. ते पहिल्यांदाही आम्हाला सोडून गेले, तेव्हाही आम्ही शिवीगाळ केली नव्हती. फक्त आम्ही ते पलटूराम आहेत, असे म्हणालो होतो. ते पलटायला नको होते. तेजस्वीकडून चूक झाली. नितीश कुमार मोदींच्या पायाखाली केले. पुन्हा एकदा पलटले. 

पुढे बोलताना लालू यादव म्हणाले, टीव्हीवर पाहतो की, प्रत्येकजण हार घालतोय. फुलं उधळतोय. नितीश कुमार यांना हे सर्व पाहून लाज वाटत नाही का? सध्या त्यांचे शरीर काम करत नाही आणि आता गांधी मैदानात जमलेले लोक पाहिले तर त्यांना कोणता आजार होईल माहिती नाही, असेही लालू यादव यांनी नमूद केले. 

बिहार जे निवडतो, त्यालाच देश फॉलो करतो 

आगामी लोकसभेत भारतीय जनता पक्षाला आम्ही नेस्तनाबूत करु. तेजस्वीला माहिती आहे की, राज्यपालांनी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान संपर्क करुन दिला होता. आमच्या सरकारमध्ये काहीही चुकीचं होत नव्हतं. काय माहिती नितीश कुमारांना काय वाटलं. आता इकडे यायचा त्यांनी विचार करु नये, नाहीतर मोठे धक्के बसतील, असा इशाराही लालू यादवांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अबकी बार भाजपा तडीपार! चारसो पार कसे जाता हे बघतोच; उद्धव ठाकरेंचं थेट मोदींना आव्हान

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts