Ankita Patil If you use offensive language for my father I too can reply in Thackeray style Ankita Patil warns to opposition Maharashtra Politics baramati Loksabha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ankita Patil, Baramati : “आम्ही जरा यंग जनरेशनमधील आहोत. आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही. आम्हाला क्लॅरिटीची सवय असते. आम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमधील सर्व गोष्टी लक्षात येतात. जे तालुकाध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती बसतात. ते जर माझ्या वडिलांबाबत असे शब्द वापरत असतील आणि माझ्या वडिलांबाबत जर एकेरी शब्द वापरले. तर मी पण त्यांना चांगल्या ठाकरी शैलीमध्ये उत्तर देऊ शकते. हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil)  यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) म्हणाल्या. त्या बारामती येथील एका सभेत बोलत होत्या. 

हर्षवर्धन पाटलांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मित्रपक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. शिंदेंना लिहिलेल्या पत्रात हर्षवर्धन पाटील म्हणाले,  इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. 

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर सभा आणि मेळावे घेत आहेत. या सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण या बाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, असं पाटील यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

अजित पवारांनाही अंकिता पाटलांनी दिला होता इशारा 

काही दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला होता. त्याची जोरदार चर्चा झाली होती. सध्या आम्ही महायुतीत आहेत. महाविकास आघाडीमध्ये होतो तेव्हा अजित पवारांनी तीन वेळेस शब्द दिला आणि नंतर पलटला. त्यामुळे तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, असा इशाराच अंकिता पाटील यांनी अजित पवारांना दिला आहे. 

Ankita Patil Speech : अंकिता पाटील यांचे बारामती येथील भाषण 

इतर महत्वाच्या बातम्या

Baramati : अजितदादांनी तीनवेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला, आता विधानसभेला आमचं काम केलं तरच लोकसभेला मदत करू; अंकिता पाटलांचा थेट इशारा

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts