India per capita income likely to be $4500 by 2031 CRISI report says India Economy News business marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) सध्या वेगानं विकसीत होत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध होतायेत. रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISI) असाच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारत 2031 पर्यंत उच्च मध्यमवर्गाचा दर्जा असलेला देश असेल असं म्हटलं आहे. तर 2031 पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न 4500 डॉलर असेल असा अंदाज व्यक्त केलाय. तर 2025 ते 2031 पर्यंत, भारताचा सरासरी विकासदर 6.7 टक्के असेल अशी माहिती देखील या अहवालात सांगण्यात आलीय. 

2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल

2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि 2031 पर्यंत उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये भारत जाईल, असा अंदाज व्यक्त केलाय. भारतीय अर्थव्यवस्था सध्याच्या पातळीपासून दुप्पट होऊन 7 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त केलाय.  CRISIL ने इंडिया आउटलुक रिपोर्ट तयार केला आहे. ज्यामध्ये देशांतर्गत संरचनात्मक सुधारणा आणि इतर घटकांसंदर्बात घेतलेले निर्णय  यामुळं भारताची आर्थिक प्रगती दिसून येईल, असं या अहवालात सांगण्यात आलंय. 

 चालू वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.6 टक्क्यांपेक्षा चांगला असण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान भारताचा GDP वाढीचा दर 7.6 टक्क्यांपेक्षा चांगला असू शकतो अशी माहिती CRISIL च्या अहवालात दिलीय. पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये यामध्ये थोडी घट होण्याची शक्यता असली तरी आर्थिक विकास दर 6.8 टक्के अपेक्षित आहे. क्रिसिलच्या मते, 2025 ते 2031 या पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था प्रथम 5 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य पार करेल आणि नंतर 7 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या जवळ जाईल. सध्या 3.6 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे . तर अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या भारतापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था आहेत.

 4000 ते 12000 डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले देश उच्च-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीत

2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2031 पर्यंत दरडोई उत्पन्न उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये नेईल. 2031 पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न 4500 डॉलरपर्यंत पोहोचेल. ज्यामुळं ते उच्च मध्यम-उत्पन्न श्रेणीतील देशात समाविष्ट केले जाईल. जागतिक बँकेच्या मते 1000 ते 4000 डॉलर दरडोई उत्पन्न असलेले देश निम्न-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीत येतात, तर 4000 ते 12000 डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले देश उच्च-मध्यम उत्पन्नाच्या श्रेणीत येतात.

महत्वाच्या बातम्या:

2050 पर्यंत देशात वृद्धांची संख्या वाढणार, देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहणं आवश्यक : स्मृती इराणी  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts