Belgaon : बेळगावात नेपाळच्या पैलवानाने जय महाराष्ट्र म्हटल्याने माईक हिसकावला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Belgaon : बेळगावात नेपाळच्या पैलवानाने जय महाराष्ट्र म्हटल्याने माईक हिसकावला बेळगावात कुस्ती सामन्या दरम्यान आयोजकांच्या महाराष्ट्र द्वेषाचा अनुभव आला. नेपाळच्या पैलवानाने जय महाराष्ट्र म्हटल्याने त्याचा माईक हिसकावून घेण्यात आला. कुस्ती सामना संपल्यावर नेपाळच्या पैलवानाने जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे आयोजकांनी त्याचा माईक हिसकावून घेतला. तसंच जय महाराष्ट्र म्हणायचं नाही असा दमही दिला. बेळगाव कुस्तीगर संघटनेच्या वतीने हिंदवाडीत कुस्ती आखाड्यात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांसाठी कर्नाटक महाराष्ट्रातून आणि इतर भागातून पैलवानांना बोलावलं होतं.. या ठिकाणी थापा या &nbsp;पैलवानाने शिवाजी महाराज की जय "जय महाराष्ट्र" अशी घोषणा करताच आयोजकांना याचा राग आला. आणि लागलीच &nbsp;त्या व्यक्तीने कन्नडमधून संभाषण करून अरे राजा "जय महाराष्ट्र" म्हणू नकोस असा इशारा दिला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts