Bengaluru Blast marathi news accused three different CCTV footages were exposed police were confused investigation system confused.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bengaluru Blast : बेंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. या प्रकरणी समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने दोन तासांत कपडे बदलल्याचे दिसून येते. आरोपींचे तीन वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरोपीचे तीन वेगवेगळे व्यक्तिमत्त्व दिसत आहेत. आरोपींच्या या कृत्याने तपास यंत्रणाही हैराण झाली आहे.

मास्क बॉम्बरची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस 

बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज सातत्याने समोर येत आहे. आरोपीने अवघ्या दोन तासात कपडे बदलल्याचे समोर आले आहे.  गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट मोठ्या नियोजनाने करण्यात आला होता. दहशतवादी स्फोट घडवूनही आरोपीला कोणतीही घाई नव्हती आणि तो थंड डोक्याने बाहेर पडत होता. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाला एक आठवडा उलटून गेला तरी आरोपीला पकडण्यात अद्यापही यश आलेलं नाही. एनआयएने संशयित मास्क बॉम्बरची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

तीन वेगवेगळे CCTV फुटेज समोर, पोलीस संभ्रमात

सीसीटीव्हीनुसार, स्फोटा घडवून आणण्यापूर्वी संशयित रामेश्वरम कॅफेमधून सकाळी 11:43 वाजता IED ठेवून निघून गेला. काही मिनिटांनंतर, BMTC बसमध्ये चढला. इथे त्याने फुल स्लीव्ह शर्ट आणि लाइट कॉलरची पोलो कॅप, डोळ्यांवर चष्मा आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसत होता.

स्फोट घडवून आणल्यानंतरचा व्हिडीओ (दुपारी 2 च्या सुमारास)

यानंतर, दुपारी 02:04 वाजता संशयित बस क्रमांक KA57F4233 मध्ये दिसला आणि येथे त्याने जांभळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट आणि काळी टोपी घातली आहे. चेहऱ्यावर मास्क आहे पण चष्मा आता गायब आहे.

स्फोटानंतरचा व्हिडिओ (रात्री 9 वाजता)

यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी बेल्लारी मध्यवर्ती बसस्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये आरोपीने टोपी किंवा चष्माही लावलेला नाही .स्फोटापूर्वी आणि नंतरचे सीसीटीव्ही पाहता हे समजते. आरोपी सतत त्याचे स्वरूप बदलत असतो होय. स्फोटानंतर आरोपीने बेंगळुरूमध्ये त्याचे कपडे बदलले होते, याचा अर्थ आरोपीला रामेश्वरम कॅफे आणि त्याच्या आजूबाजूच्या मार्गांची पूर्ण माहिती होती.

1 मार्च रोजी हा स्फोट घडवून आणला

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवार, 1 मार्च रोजी दुपारी 1 वाजता बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये 10 लोक जखमी झाले होते. स्फोट होताच आत धुराचे लोट पसरले, यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावताना दिसले. सुरुवातीला लोकांना वाटले की कदाचित हा सिलेंडरचा स्फोट असावा, पण जेव्हा पोलिस आणि एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा संशयाची सुई दुसरीकडे वळली. त्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे एनआयएकडे सोपवण्यात आले. इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) मुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. यानंतर लगेचच कर्नाटक पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय

या स्फोट प्रकरणात दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. जुनैद आणि सलमान अशी त्यांची नावे सांगितली जात आहेत. हे दोघे सध्या अझरबैजानमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोघांचे लोकेशन आधी दुबईत सापडले, मात्र नंतर ते तेथून फरार झाले. दोघेही लष्कर मॉड्यूलचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलैमध्ये, गुप्तचर यंत्रणांनी बेंगळुरूमध्ये लष्कर मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली.

 

हेही वाचा>>>

Bengaluru Blast : आधी इडली ऑर्डर, मग घडवला ‘स्फोट, 56 मिनिटांचा कट! बेंगळुरू बॉम्बस्फोटातील आरोपीचा शोध सुरू

 

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts