Before Lok Sabha elections congress Leader Rahul Gandhi gave five guarantees to the people loksabha Election 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi  : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केलीय. काँग्रसने (Congress) देखील जनतेचा कौल मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी जनतेला 5 हमी दिल्या आहेत. या 5 हमी जाहीर केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

राहुल गांधींच्या 5 हमी कोणत्या?

युवकांसाठी नोकऱ्या 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या पाच हमीपैकी महत्वाची पहिली हमी म्हणजे युवकांसाठी रोजगार देणे ही आहे. 
भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी राजस्थानमधील बांसवाडा येथे आपल्या 5 हमींची माहिती दिली. त्यातील नोकऱ्या देणार ही पहिली हमी आहे. 

तरुणांना प्रशिक्षण 

तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देणं ही राहुल गांधी यांची दुसरी हमी आहे. या माध्यमातून हे तरुण स्वत: च्या पायावर उभे राहतील हा यामागचा उद्देश आहे. 

युवकांना स्टायपेंड देणं

तरुणांना प्रशिक्षणासह स्टायपेंड देण्याची ही सरकारची हमी आहे. सरकारकडून प्रत्येकी एक लाख रुपये स्टायपेंड मिळणार आहे. 

पेपर फुटणार नाहीत याची काळजी घेणं

राहुल गांधी यांनी दिलेली चौथी महत्वाची हमी म्हणजे पेपर फुटणार नाही याची काळजी घेणं ही आहे. 

स्टार्टअप सुरु करण्यासाठी  निधी 

राहुल गांधी यांनी दिलेली पाचवी हमी म्हणजे स्टार्टअप आणि निधीबाबत आहे. या अंतर्गत कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. स्टार्टअप सुरु करण्यासाठी युवकांना निधी देण्यात येणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
  
काँग्रेसने सरकार बनवल्यास आधी या पाच हमींची पूर्तता करु, असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींची पहिली हमी नोकरीची आहे. देशातील 25 वर्षांखालील प्रत्येक पदवीधराला नोकरीची हमी मिळाली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. 

या हमीबद्दल अर्थतज्ज्ञांना काय वाटतं?

अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपाययोजनांना दीर्घकाळासाठी अर्थव्यवस्थेवर ओझे मानले जाते.  अशा योजना कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी दुधारी तलवार मानल्या जातात. विशेषत: भारतासारख्या अर्थव्यवस्थेत, जी सध्या कमी उत्पन्न श्रेणीच्या वर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनांचे दीर्घकालीन परिणाम नकारात्मक असू शकतात. एडीआरच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अशा योजनांमुळे सामान्य लोकांचे सरकारवरील अवलंबित्व वाढते. NITI आयोग देखील याबबात सहमत असल्याचे दिसते. या योजना उद्योजकतेची संकल्पना कमकुवत करतात, जी दीर्घकाळासाठी खूप वेदनादायक ठरु शकते.

महत्वाच्या बातम्या:

Rahul Gandhi : दक्षिणेचा गड राखण्यासाठी राहुल गांधी वायनाडमधून पुन्हा रिंगणात, अमेठीतून उतरणार की नाही?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts