Tata Steel Plant Accident Steam Leaks At Tata Steel Plant In Odisha Affected Workers Hospitalised

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tata Steel Plant Accident:  ओडिशामधील टाटा स्टील पॉवर प्लांटमध्ये (Tata Steel Plant) स्टीम लीक झाले आहे. या अपघातात काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडलीमध्ये हा अपघात झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जवळपास 19 कर्मचारी जखमी झाले आहेत. 

टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ओडिशातील ढेंकनाल येथील टाटा स्टील मेरामंडली वर्क्स येथे स्टीम लीक झाल्याने BFPP2 पॉवर प्लांटमध्ये अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवार 13 जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात निरीक्षण-देखरेख करणारे आणि त्या ठिकाणी काम करणारे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सर्व आपात्कालीन प्रोटोकॉल पावले  उचलण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली. 

 

अपघाताची चौकशी होणार

टाटा स्टील कंपनीने म्हटले की, या अपघातानंतर त्यांनी पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कंपनीकडून त्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य केले जात आहेय  कंपनी अपघाताचे कारण शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली. 



[ad_2]

Related posts