CBI Arrests EPFO Official For Allegedly Receiving Rs 12 Lakh Bribe

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

EPFO: भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) एका अधिकाऱ्याला 12 लाखाची लाच घेताना रंगेहात सीबीआयने अटक केली. एका रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला ठोठावलेल्या दंडाच्या रक्कमेत तडजोड करण्यासाठी या अधिकाऱ्याने 12 लाखांची लाच मागितली होती. मंगळवारी, सीबीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ऋषी राज असे अटक केलेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. आरोपीने दिल्लीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची तपासणी केली आणि तक्रारकर्त्याला (त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या) हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची माहिती दिली. या अनियमिततेसाठी 15 कोटींचा दंड ठोठावला जाऊ शकतो,असे आरोपी अधिकाऱ्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला सांगितले. 

आरोपी ऋषी राजने हे प्रकरण तडजोड करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दंडाच्या रक्कमेऐवजी 12 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सीबीआयने लाच स्वीकारताना ईपीएफओ अधिकारी ऋषी राजला रंगेहात अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिली. 

PF काढण्यासाठी ‘आधार’ची माहिती बदलली; सीबीआयकडून एकाला अटक 

आधार कार्डच्या माहितीत फेरफार करून ऑनलाइन पीएफ रक्कमेसाठी दावा करणाऱ्या सदस्यांच्या निधीवर डल्ला मारल्याप्रकरणी एका आरोपीला आज सीबीआयने अटक केली.  दिल्लीतील प्रियांशू कुमारने आपल्या इतर सहकाऱ्यांसह ही फसवणूक केली. ज्या ईपीएफओ सदस्यांचे आधार कार्ड त्यांच्या पीएफ खात्याशी निगडीत नाही, अशा लोकांना या टोळीने लक्ष्य केले. 

सीबीआयने म्हटले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) च्या 11 सदस्यांची 39 बनावट दाव्यांची फसवणूक करण्यात आली आणि 1.83 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. सीबीआयने 8 फेब्रुवारी 2022 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) तक्रारीवरून सात आस्थापना आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध खर्‍या लाभार्थ्यांच्या पीएफ खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे काढण्याच्या उद्देशाने ओळख चोरीच्या कथित फसवणुकीसाठी गुन्हा नोंदवला होता. 

या टोळीने नागपूर, औरंगाबाद, पाटणा, रांची यांसारख्या विविध शहरांमध्ये कथित आस्थापना नोंदवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये कोणत्याही भौतिक पडताळणीशिवाय पीएफ कव्हरेज ऑनलाइन घेतले जात होते. या आस्थापनांशी जोडलेला युनिक अकाउंट नंबर (UAN) एकूण योगदान खात्यांच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे, असल्याचे तपासात आढळले. सीबीआयने म्हटले की, या टोळीने त्यांच्या आस्थापनांमध्ये खऱ्या कर्मचार्‍यांचे यूएएन कथितपणे नोंदवले आणि त्यांना केवळ एका दिवसासाठी त्यांचे कर्मचारी म्हणून दाखवले.

बिहार, झारखंड आणि दिल्लीत आठ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.  प्राथमिक तपासात असे दिसून आले की UAN असणा-या अस्सल कर्मचार्‍यांनी या बनावट नियोक्त्यांसोबत कधीही काम केले नाही, परंतु या टोळीला कर्मचार्‍यांना दैनंदिन सेवा दाखवून त्यांचे KYC  तपशील बदलण्याची सोय करण्यात आली होती. सीबीआयने बिहार, झारखंड आणि दिल्लीमध्ये कुमार आणि इतरांच्या आठ ठिकाणी छापे टाकले होते, ज्यातून विविध कागदपत्रे, मोबाईल फोन, एटीएम कार्ड, चेकबुक आणि पासबुक जप्त करण्यात आले होते. सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, विशेष न्यायालयाने कुमारला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

[ad_2]

Related posts