[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Eknath Shinde And Devendra Fadanvis : ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जाहिरातीवरुन सारवासारव करण्यात येत आहे. या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाचा काहीही संबध नाही. हितचिंतकाने ही जाहिरात दिलेली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर 30 वर्षापूर्वी केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांची वादग्रस्त जाहिरातीवर दिली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आमच्या मनात आहेत म्हणून फोटोत नसले तरी चुकीचा अर्थ काढू नये, असेही ते म्हणाले.
युतीतील वातावरण बिघडणारी जाहिरात – दरेकर
अशा प्रकारच्या जाहिराती देणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. एखाद्या सर्वेमध्ये जर अशाप्रकारे शिंदे यांना पसंती लोकांची आली असेल तर चांगलं आहे. जाहिरात केल्याच्या अडचण नव्हती, पण यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना कमी पसंती आहे, अशा प्रकारचे दाखवण्याचं काय प्रयोजन आहे ? हे आम्हाला कळलं नाही, असे दरेकर म्हणाले.
हा खोडसाळपणा कोणी केला ? शिवसेनेने जाहिरात केली असेल तर ते अयोग्य आहे. त्यांनी जर जाहिरात दिली नसेल तर युतीमध्ये मिठाचा खडा कोण टाकतय?? अजून तरी जाहिरात कोणी दिली याची माहिती मला मिळाली नाही. अशा जाहिराती देऊन दुसऱ्याला कमी लेखण्याचा कारण नाही. यामुळे युतीमधील वातावरण खराब होईल…त्यामुळे युतीत विसंवाद होऊ शकतो. देवेंद्र फडणीस किती लोकप्रिय आहे महाराष्ट्राला माहिती आहे. या जाहिराती मागे काय आहे ? हे जाहिरात देणारे सांगू शकतील… हे जर दबाव तंत्र असेल तर युतीत योग्य नाही. शिवसेनेचे नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. एकमेकांचे नेत्यांचा सन्मान केला पाहिजे, त्याचा फायदा विरोधी पक्ष घेतील. माझं स्पष्ट मत आहे ही जाहिरात अयोग्य आहे… युतीतील वातावरण बिघडणारी जाहिरात आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.
जाहिरातमध्ये नेमकं काय आहे ?
राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार…
[ad_2]