Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lunar Eclipse On Holi 2024 :  होळी म्हणजे रंगांची उधळण, जात, धर्म, भेदभाव विसरुन एका रंगात न्हावून निघाणार हा सण. फाल्गुन महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाला वेध लागतात ते होळीचे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण होळीचा रंगात न्हावून निघतात. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी होळी दहन हा फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. तर दुसऱ्या दिवशी होळीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. यंदाची होळी अतिशय खास असणार आहे. (Chandra Grahan 2024 After almost 100 years Lunar Eclipse on Holi the golden period of these zodiac signs will begin)

खगोलशास्त्र आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही होळी अतिशय खास असणार आहे. कारण तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहण हे ज्योतिषशास्त्रात शुभ मानलं जातं नाही. यावर्षी होळी 25 मार्च 2024 ला असणार असून या दिवशी चंद्रग्रहण सकाळी 10:23 ते दुपारी 03:02 वाजेपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे सुतक कालावधीही वैध नसणार आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी असणारं चंद्रग्रहण हे काहींसीठी नकारात्मक तर काहींसाठी सकारात्मक ठरणार आहे. तर होळीला असणारी चंद्रग्रहणाची सावली कुठल्या राशींसाठी लकी असणार आहे, ते पाहूयात. 

मेष  (Aries Zodiac)

या वर्षातील पहिलं चंद्रग्रह जे होळीला असणार आहे. ते मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे. अगदी वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे. तुमचे अनेक काळापासून रखडलेले पैसे परत मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात भौतिक सुख सोयी आणि संपत्तीत वाढ होणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या सामाजिक पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही अगदी जमीन किंवा वाहन खरेदी करणार आहात. व्यावसायिक जीवनात पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होणार आहे. तुमची व्यवसायातील स्थिती मजबूत होणार असून आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. चौहीबाजूने पैसाच पैसा मिळणार आहे. एखाद्या जुन्या मालमत्तेतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीसाठीही होळीचा सण आर्थिक प्रगती करणारा ठरणार आहे. चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम दिसणार असून तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे अनेक संधी मिळणार आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारणार आहे. आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. पैशांचा ओघ वाढणार आहे. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे. अगदी करिअरमध्ये नवीन यश तुमची वाट पाहत आहे. आयुष्यात सुख सुविधांनी संपूर्ण असणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts