Cyclone Biparjoy Updates Landfall Gujarat Maharashtra Thursday Afternoon Rainfall Imd Alert

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cyclone Biparjoy Landfall : देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) परिणाम पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. गुजरात (Gujrat) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर आहे. अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरात, महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग 150 किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहेय. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत. हा बिपरजॉय चक्रीवादळाचा ट्रेलर असल्याचं म्हटलं जात आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरातसह महाराष्ट्रात दिसून येत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. किनारपट्टी भागातील सुमारे 30 हजार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार

हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. कच्छ भागात याचा सर्वाधिक प्रभाव पडेल. 15 जूनला चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग किनाऱ्याजवळ 125-135 किमी प्रतितास असेल. सध्या अरबी समुद्रातील हे वादळ 8 किमी प्रतितास वेगाने जवळपास वायव्य दिशेकडे सरकत आहे.

पूर आणि नुकसानीची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी मोरबी, द्वारका, जामनगर, राजकोट, पोरबंदर येथे मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे पडू शकतात, कच्च्या घरांची पडझड होऊ शकते, पक्क्या घरांचंही नुकसान होऊ शकते, तसेच टेलिकॉम आणि रेल्वेच्या कामावरही परिणाम होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts