Lok Sabha Election 2024 Date Election Commission Press Conference  What Are The Important Challenges Facing The Lok Sabha Elections 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election 2024 : आजपासून लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. एकूण 7 टप्प्यात  देशातील लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यात देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर 4 जूनला या या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत महत्वाची चार आव्हानं समोर असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी दिली. नेमकी काय आव्हानं आहेत, त्याबद्दलची माहिती पाहुयात.  

यावेळी देशात 96 कोटी मतदार असून 5 लाख मतदान केंद्र आहेत. तर 1.5 कोटी निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. या लोकसभा निवडणुकीतील चार आव्हानेही राजेश कुमार यांनी सांगितली. यामध्ये पहिलं आव्हानं हे त्यांनी मसल म्हणजे गुन्हेगारी, मनी म्हणजे पैशांची वापर, चुकीची माहिती ( Missinformation) आणि महत्वाचं आव्हानं म्हणजे आचारसंहितेचा भंग. ही चार आव्हाने असल्याचे राजेश कुमार म्हणाले. 

निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा

दरम्यान, या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि 100 मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल –  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

महत्वाच्या बातम्या:

Lok Sabha Election 2024 Dates : लोकसभा निवडणूक 2024 , मतदान कधी, निकाल कधी, सर्व माहिती एकाच ठिकाणी!

[ad_2]

Related posts