Rahul Gandhi’s Bharat Jodo Nyay Yatra Meeting at Shivtirtha Mumbai Veteran leaders including Sharad Pawar Uddhav Thackeray will be present

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण भारतात सुरु होती. या यात्रेनंतर उद्या मुंबईतील शिवतीर्थावर सायं 5 वाजता भव्य समारोप सभा होणार आहे. या भव्य सभेत इंडियाची एकजूट दिसणार आहे. याच सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती आहे. ही भव्य सभा होण्यापूर्वी उद्या खा. राहुल गांधी यांची मुंबईत ‘न्याय संकल्प’ पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही ‘न्याय संकल्प’ पदयात्रा असणार आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दिग्गज नेते राहणार उपस्थित 

राहुल गांधींच्या या सभेला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा  विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे  १५ हून  अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान पदयात्रा

सभेपूर्वी उद्या राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प  पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ही पदयात्रा असणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी खा. राहुल गांधी चर्चा करणार आहेत.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा धारावीत आल्यानंतर त्याठिकाणी भाषण केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. एका वर्षाआधी आम्ही भारत यात्रा केली.अनेकांनी म्हटलं की, अनेक ठिकाणी आपण नाही गेलात आणि आम्ही मणिपूर ते मुंबई ही यात्रा केली. ही यात्रा धारावीत समाप्त झाली. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, धारावी स्कीलचं कॅपिटल आहे. सुरुवात आम्ही मणिपूरमधून केली कारण सिव्हिल वॉरचं वातावरण भाजपनं तयार केलंय. यात्रेत त्यामुळेच आम्ही न्याय हा शब्द जोडला. कारण गरीब, शेतकरी, कामगार वर्गासोबत अन्याय होतोय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Rahul Gandhi: चैत्यभूमीसमोर राहुल गांधींचं सावरकरांच्या गाण्याने स्वागत, बँड पथकाने वाजवली ‘जयोस्तुते जयोस्तुतेची’ सुरावट

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts