Electoral Bonds : भाजपला 6986 कोटींची देणगी, काँग्रेस तिसऱ्या स्थानी, कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली? निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँडची माहिती जारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Electoral Bonds : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार निवडणूक रोखे वटवत भाजपने तब्बल 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. 2019 – 2020 या काळात 2555 कोटी रुपयांची कमाई भाजपने केले आहे, अशी माहिती या रेकॉर्डमधून समोर येत आहे. 

निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यात कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाने किती निधी दिला हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर निवडणूक आयोगाने एसबीआयकडे बोट दाखवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला झापले होते. 

आता निवडणूक आयोगाने कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले याबाबत माहिती जारी केली आहे. त्यानुसार रोखे वटवत कमाई करणाऱ्या पक्षामध्ये भाजपने 6 हजार 986 कोटींची कमाई केली आहे. तृणमूल काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावर असून  1334.35 कोटींची कमाई केली आहे. 

कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले? 

भाजपा : 6 हजार 986.5 कोटी
तृणमूल काँग्रेस : 1387 कोटी
काँग्रेस : 1334.35 कोटी
डीएमके : 656.5 कोटी
बिजू जनता दल : 944.5 कोटी
वायएसआर काँग्रेस : 442.2 कोटी
तेलगू देसम : 181.35 कोटी
बीआरएस : 1322 कोटी
सपा : 14.05 कोटी
अकाली दल : 7.26 कोटी 
AIADMK : 6.05
नॅशनल कॉन्फरन्स : 50 लाख 

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अरुणाचल, सिक्किम मतमोजणीची तारीख बदलली, पण यामागचं नेमकं कारण काय ?

मविआचं ठरलं! सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उमेदवार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts