INDIA Alliance Sabha at Shivaji Park mumbai Rahul Gandhi Uddhav Thackeray Sharad Pawar Mallikarjun Kharge Mehbooba Mufti maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने (INDIA Alliance) आज मोदी सरकारविरोधात (Modi Government) रणशिंग फुंकलं आहे. मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडीने हुंकार दिला आहे. रविवारी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात इंडिया आघाडीच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. इंडिया आघाडीने एका मंचावर येत मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाचं निमित्त साधत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 

शिवाजी पार्कातील सभेला इंडिया आघाडीच्या नेत्यांची मांदीयाळी – 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडत आहे. शिवाजी पार्कवरील या सभेतून इंडिया आघाडीच्या लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवाजी पार्कातील आजच्या सभेला इंडिया आघाडीच्या नेत्यांची मांदीयाळी होती. राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते उपस्थित आहेत.

हुकूमशाही विरोधात आमची लढाई : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं की, भाजप एक फुगा आहे, या फुग्यामध्ये आम्हीच हवा भरली. त्यांना विचारलं किती जागा येतील, ते म्हणतात 400 पार, हे काय फर्निचरचं दुकान आहे? आम्ही विरोधी आहोत, पण हुकूमशाही विरोधात आहोत. तुमच्या परिवारात आहे कोण मोदीजी, तुम्ही आणि तुमची खुर्ची. 400 पार कशासाठी हवं आहे? अनंत कुमार हेगडे म्हणाले आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून 400 पार आकडा हवा आहे. 

अबकी बार भाजप तडीपार

रशियामध्ये निवडणुका सुरु आहेत, पण पुतीन यांच्याविरोधात लढायला कोणी विरोधक नाही. देशाची ओळख व्यक्ती होता कामा नये. व्यक्तीची ओळख देश असली पाहिजे. अटलजींनी चांगलं सरकार चालवलं. 2024 पासून एकाच पक्षाचं सरकार आहे. जेव्हा सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकूमशाही गाडली जाते. तुम्हाला मोडून तोडून टाकण्यासाठी लढायला आम्ही मैदानात उतरलो आहोत. आता आपला एकाच नारा, अबकी बार भाजप तडीपार

राजाचा आत्मा⁠ ईव्हीएम, ईडी आणि सीबीआयमध्ये : राहुल गांधी

राहूल गांधी यांनीही भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही,  आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहे. ⁠राजाचा आत्मा ईव्हीएम, ⁠ईडी आणि सीबीआयमध्ये आहे. ⁠काँग्रेसचा एक नेता माझ्या आईकडे येऊन रडला की, मी या शक्तीच्या विरोधात लढू शकत नाही. ⁠मी जेलमध्ये जायचं नाही,  ⁠असे अनेक नेते आहेत. काल माझ्या गाडीवर एक तरुणाने उडी मारली. ⁠त्याला पोलिसांनी खूप मारलं, ⁠पण तो भेटला म्हणाला, मला सैनिक व्हायचं होतं, पण ⁠मात्र देशाने मला दगा दिला.’

शरद पवारांचा ‘भाजपा छोडो’चा नारा

शरद पवार यांनी देखील यावेळी मोदी गॅरंटीवर जोरदार प्रहार केला. शरद पवार म्हणाले की, जे आश्वासन देतात, मात्र ती पाळत नाही त्यांना उलथून टाकावा लागेल. ⁠मोदी याची गॅरंटी आहे, मात्र त्याला सेक्युरिटी नाही. ⁠महात्मा गांधी यांनी छोडो भारताचा नारा दिला होता, आता ‘भाजपा छोडो’चा नारा दिला पाहिजे.

सोबत असो वा नसो, पण एकत्र लढायला हवं

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ⁠काही कंपन्या आहेत की, त्यांचं उत्पन्न 200 कोटी आणि इलेक्ट्रीकल बॉन्ड हजार कोटी रुपये खरेदी करतात. सोबत असो वा नसो, विरोधात लढलं पाहिजे. एकटे लढले पाहिजे पण, लढलं पाहिजे. बंगालमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात प्रयत्न केले जात आहेत की आपण सर्व मिळून सर्व शक्तीनिशी लढू.

आमच्यासारखी तुमची परिस्थिती होऊ नये म्हणून…

मेहबूबा मुफ्ती यांनी यावेळी म्हटलं की, गांधी परिवाराने आपला जीव गमावलेला आहे. ⁠त्यामुळे गांधी नावाला भाजप घाबरत आहे.⁠ मोदींनी आश्वासन दिली मात्र, त्यांनी काय केलं. ⁠मोदी चारशे पार का म्हणत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे. ⁠मी जम्मूमधून येते मात्र तिथे संविधान संपलेलं आहे. आमच्यासारखी तुमची परिस्थिती होऊ नये, यासाठी विचार करुन मतदान करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

झारखंडमध्ये कधीही कमळ फुलणार नाही : कल्पना सोरेन

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी इंडिया आघाडीच्या सभेला हजेरी लावत भाजप सरकारला आव्हान दिलं आहे. ‘शिवाजी पार्कमधून सांगते की झारखंड झुकणार नाही. तसंच इंडियाही झुकणार नाही आणि थांबणारही नाही. ⁠झारखंडमधये कधीही कमळ फुलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

एक नेता पक्ष सोडण्याआधी रडला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सांगितलं की, एक नेता इथला सोडून गेला, त्याच्या आधी ते सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि रडले. ⁠त्याच्या आधी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, भाजपची लोक मला त्रास देत आहेत. ⁠रोज ईडी आणि सीबीआय लावली जात आहे. ⁠मला ही लोक फासावर लटकवतील. ⁠पण अशा परिस्थितीत तुम्ही लढण्यापेक्षा पक्ष सोडून जाता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सौरभ भारद्वाज काय म्हणाले ? 

आम आदमी पक्षाचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनाही यावेळी सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि इलेक्ट्रोरल बाँडवर त्यांनी मतं व्यक्त केली. सर्वांनी फेसबूक लाईव्ह करत इलेक्ट्रोरल बाँडबद्दल माहिती द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts