Kangana Ranaut Shocked To See Sadhguru Jaggi Vasudev Health Condition express her emotions after Sadhguru Jaggi Vasudev undergoes emergency brain surgery

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kangana Ranaut On Sadhguru  Jaggi Vasudev Health :  अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. जग्गी वासूदेव यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर अभिनेत्री कंगनाला धक्का बसला आहे. तिने आपल्या भावना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेत्री कंगना रणौत नेहमी सद्गुरू जग्गी वासुदेव आणि ईशा फाउंडेशनसोबतच्या भेटीगाठी याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री कंगनाने बुधवारी रात्री सोशल मीडियावर एक ट्वीट केले. तिने म्हटले की, आज मी सद्गुरू वासुदेव यांना आयसीयूमध्ये पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. सद्गुरु वासुदेव हे देखील आपल्यासारखे हाडामासांचे व्यक्ती आहेत, हे याआधीच कधीच जाणवले नाही. 

कंगनाला बसला धक्का, भावनांना वाट मोकळी

कंगनाने म्हटले की, सद्गुरू वासुदेव यांना पाहून मला वाटलं की आता देवही कोसळला आहे. पृथ्वीदेखील हादरली, आकाशाने साथ सोडली, माझे डोके गरगरत आहे, मी हे वास्तव समजू शकत नाह आणि  त्यावर मला विश्वासही ठेवायचे नाही. अचानकपणे मी तुटली आहे. आज माझे दु:ख लाखो लोकांसोबत शेअर करत आहे, त्यांना सांगत आहे. मी त्याला थांबवू शकत नाही. सद्गगुरू हे लवकरच बरे व्हावे, अन्यथा सूर्य उगवणार नाही, पृथ्वी हलणार नाही, हे क्षण निर्जिव आणि स्थिर झाली असल्याचे कंगनाने म्हटले. 

सद्गुरुंची प्रकृती कशी आहे?

सद्गुरू जग्गी वासुदेव हे सध्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी जग्गी वासुदेव यांनी रुग्णालयातून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला. त्यांनी म्हटले की, अपोलो रुग्णालयाच्या न्यूरोसर्जन डॉक्टरांनी माझ्या मेंदूत काही शोधण्यासाठी मेंदूत शस्त्रक्रिया केली. मात्र, त्यांना काहीच सापडलं नाही. पू्र्णपणे रिकामा आहे. त्यामुळे त्यांनी आपला हार मानली आहे. मी दिल्लीत आहे, डोक्यावर पट्टीवर बांधली आहे. पण, पण माझ्या मेंदूला इजा झालेली नाही.

काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार आठवड्यांपासून सद्गगुरू जग्गी वासुदेव यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. हा त्रास गंभीर असताना ही त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. महाशिवरात्रीच्या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts