BJP announces third list of candidates for general election 2024 includes nine candidate narendra modi amit shah

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP Candidate List : लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election) सध्या संपूर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आलाय. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून (BJP) पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जातोय. एखाद्या नेत्याची जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच भाजपाकडून संबंधित नेत्याला तिकीट दिल जात आहे. भाजपाने याआधी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. असे असतानाच आता भाजपाने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी (BJP Candidate Third List) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. 

पहिली यादी 2 मार्च रोजी

भाजपाने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी महाराष्ट्राती भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी जाहीर केली होती. या यादीत देशभारीतल वेगवेगळ्या 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यात सध्या मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या 34 मंत्र्यांचा समावेश होता. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत एकूण 28 महिला नेत्यांनाही तिकीट दिलेले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता.

पहिल्या यादीत कोणाचा समावेश?

भाजपाच्या या तिसऱ्या यादीत एकूण 9 जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या सर्व जागा या तमिळनाडू राज्यातील आहेत.  यामध्ये तमिळनाडूचे भाजपाचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश आहे. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत.

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts