bharatiya janata party bjp releases fourth list of candidates for general election 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याही यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. भाजपच्या या चौथ्या यादीत पुदूच्चेरी तसेच तमिळनाडू राज्यातील 14 जागांचा समावेश आहे.

तिसऱ्या यादीत 9 जणांचा समावेश 

याआधी भाजपने 21 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश होता. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत. तिसऱ्या यादीमध्येदेखील तामिळनाडूच्या मतदारसंघांचाच समावेश होता. भाजप हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. हा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे त्याच्या प्रत्येक जागेवरील उमेदवाराकडे लोकांचे लक्ष आहे.  

दुसऱ्या यादीत 72 जणांची नावे 

ज्या मतदारसंघांवर कोणताही वाद नाही किंवा मित्रपक्षांचा दावा नाही, अशाच मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा भाजपकडून केली जात आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत अशा 72 मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये पीयुष गोयल, अनुराग ठाकुर, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोरहलाल ठक्कर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावांचा समावेश होता.

   

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts