bjp released fifth list of 111 candidates in various states here some major points of list

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या (BJP ) केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गेल्या दोन दिवसांमध्ये पार पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीनंतर भाजपनं आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 111 उमेदवारांच्या नावांची यादी (BJP  Fifth List) जाहीर केली आहे. या यादीत आंध्र प्रदेश 6, बिहार 17, गोवा 1, गुजरात 6, हरियाणा 4, हिमाचल प्रदेश 2, झारखंड 3, कर्नाटक आणि केरळ मध्ये चार उमेदवार देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 3,  मिझोरम 1, ओडिशा 18 , राजस्थान 7, सिक्कीम 1, तेलंगाणा 2, उत्तर प्रदेश 13 आणि पश्चिम बंगालच्या 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. 

भाजपकडून 402 उमेदवार जाहीर 

भाजपकडून यापूर्वी चार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. भाजपनं पहिल्या यादीत 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत भाजपनं 72 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तिसऱ्या यादीत 9 आणि चौथ्या यादीत  15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भाजपनं पहिल्या चार याद्यांमध्ये 291 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आज भाजपनं पाचव्या यादीत 111 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून आतापर्यंत एकूण 402 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.  

पक्षात एंट्री करताच उमेदवारी जाहीर

भाजपमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. झारखंडमधील  सीता सोरेन या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना भाजपनं दुमका लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपची यादी जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदल यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांना हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

कंगना रणौत आणि अरुण गोविल यांना उमेदवारी

भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

ओडिशात एकला चलो

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईक यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा सुरु होत्या. मात्र, भाजप आणि बिजदच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्यानं ओडिशात भाजपची एकला चलोची भूमिका असल्याचं समोर आलं आहे. 

वरुण गांधींचं तिकीट कापलं, राहुल गांधींविरोधात उमेदवार

भाजपच्या धोरणांविरोधात भूमिका मांडणाऱ्या खासदार वरुण गांधी यांची उमेदवारी भाजपकडून  कापण्यात आली आहे. वरुण गांधी यांच्या आई मनेका गांधी यांना सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, पीलीभीतमधून वरुण गांधी यांची उमेदवारी कापण्यात आली असून त्यांच्या जागी जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केरळमधून भाजपनं वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात के. सुरेंद्रन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

दरम्यान, भाजपच्या पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील मेंढे, अशोक नेते या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी कापण्यात आली असून भाजपनं त्याठिकाणी राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे.  

संबंधित बातम्या :

सोलापूरचा भाजप उमेदवार ठरला, प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुते मैदानात

मोठी बातमी : कंगना राणौत, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट, भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts