UPSC Recruitment 2024 advertisement for economic officer recruitment government job sarkari nokari marathi latest news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने वेगवेगळ्या पदांसाठी जारी केलेल्या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली आहे. यूपीएससीतून इकॉनॉमिक ऑफिसर पदांसाठी जाहिरात (UPSC Recruitment For Economic Officer) काढण्यात आली असून त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केवळ 25 रुपये इतके परीक्षा शुल्क आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 

UPSC ने इकॉनॉमिक ऑफिसर आणि इतर पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी जाहिरात काढली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 मार्च रोजी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. UPSC इकॉनॉमिक ऑफिसर भर्ती 2024 साठी ऑनलाईन अर्ज 28 मार्च 2024 पर्यंत भरले जातील.

महत्त्वाच्या तारखा – 

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू : 9 मार्च 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024 रात्री 11.59 पर्यंत

सबमिट केलेला फॉर्म प्रिंट करण्याची शेवटची तारीख : 29 मार्च 2024 रात्री 11.59 पर्यंत

UPSC Recruitment 2024 : रिक्त जागांचा तपशील

UPSC भरती 2024 मोहिमेद्वारे 28 रिक्त पदे भरली जातील. यात मानववंशशास्त्रज्ञाची म्हणजे अँथ्रोपोलॉजिस्ट 8 पदे, असिस्टंट कीपरची 1 पदे, शास्त्रज्ञ बी 3 पदे, रिसर्च ऑफिसर/ प्लानिंग ऑफिसर 1 पद, असिस्टंट मायनिंग जिऑलॉजिस्ट 1 पद, असिस्टेंट मिनरल इकॉनोमिस्ट ऑफिसर 1 पद, इकॉनोमिस्ट ऑफिसर, वरिष्ठ व्याख्याता 9 पदांचा समावेश आहे. किंवा असिस्टेंट प्रोफेसर 4 जागा आहेत.

UPSC Recruitment 2024 : अत्यावश्यक पात्रता आणि वयोमर्यादा

UPSC भरतीसाठी, पदानुसार पात्रता निकष वेगळ्या पद्धतीने ठरवले गेले आहेत. डिप्लोमा, मास्टर डिग्री, बीटेक, एमडी आणि एमएस असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादाही वेगळी आहे. उमेदवाराचे वय 30, 35, 40 ते 50 वर्षे असावे.

UPSC Recruitment 2024 : अर्ज फी किती?

UPSC भरती 2024 साठी, सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून फक्त 25 रुपये भरावे लागतील. तर अपंग, महिला, SC, ST उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोखीने किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेद्वारे किंवा  हिसा/मास्टर/रुपे/क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे अर्ज फी भरली जाऊ शकते.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts