बापानं मुलाचे कपडे उतरवले, हात-पाय बांधून रेल्वे ट्रॅकवर बसवले; भरधाव ट्रेन आली अन् मग… – stripped hands tied boy made to sit on railway track by father in up

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनऊ: घरातून गायब असलेल्या मुलावर संतापलेल्या वडिलांनी त्याचे कपडे उतरवले. त्यानंतर त्याला प्लास्टिकच्या दोरीनं रेल्वे रुळांना बांधलं. यानंतर वडील काही अंतरावर जाऊन बसले. यादरम्यान तिथून एक भरधाव ट्रेन आली. तितक्यात मुलाची बहीण तिथे आली. तिनं वडिलांची समजूत काढली आणि लहान भावाला रेल्वे रुळांवरुन बाजूला केलं. तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडीओची दखल घेत जीआरपीनं तपास सुरू केला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हरदोई रेल्वे स्थानकाजवळील सीतापूर उड्डाणपुलाच्या खालील असल्याचं सांगितलं जात आहे. या पुलाजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीनं त्याच्या मुलाचे हात, पाय प्लास्टिकनं बांधले आणि त्याला रेल्वे रुळांच्या मधोमध बसवलं.
मी तिची इच्छा पूर्ण केली! आईला झोपेच्या ९० गोळ्या देऊन मारणाऱ्या लेकीची धक्कादायक कबुली
अल्पवयीन मुलगा रविवारी सकाळी घरातून निघाला होता. तो रात्री होऊनही घरी पोहोचला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र त्याचा ठावठिकाणा सापडला नाही. रात्री ११ वाजता मुलगा घरी पोहोचला. सकाळी घराबाहेर पडलेला मुलगा इतक्या उशिरा घरी आल्याचं पाहून वडील संतापले. त्यांनी मुलाचे कपडे उतरवले. त्याचे हात-पाय प्लास्टिकच्या दोरीनं बांधून रेल्वे रुळांवर बसवले. यानंतर वडील रेल्वे रुळांच्या शेजारी जाऊन बसले.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसते. ती वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करते. अपघात होण्याची भीती बोलून दाखवते. तितक्यात दुरुन एक ट्रेन येताना दिसते. मुलाची मोठी बहीण पुढे होऊ शकणाऱ्या अनर्थाची जाणीव वडिलांना करुन देते. यानंतर वडील जागेवरुन उठतात आणि मुलाला काही अंतरावर नेऊन बसवतात, स्वत:देखील तिथे बसतात.
तुझा नवरा तिच्यासोबत रंग उधळतोय! इंजिनीअरच्या बायकोला मेसेज; २०० किमीवरुन घरी आली अन्..
हा संपूर्ण प्रकार अनेकांनी पाहिला. तिथे बरीच गर्दी होती. अनेकांनी घटना मोबाईलमध्ये कैद केली. मात्र कोणीही मुलाच्या मदतीला आलं नाही. मुलाच्या वडिलांना समजवाण्याचा प्रयत्नदेखील कोणी केला नाही. मात्र त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याची दखल घेत जीआरपी ठाणे प्रभाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

[ad_2]

Related posts