[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नागपूर : काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. मात्र माझाला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल, असं कळतंय. आशिष देशमुख यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले होते. आज अखेर त्यांच्या प्रवेशाच्या बातमीने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजीत देशमुख यांना मानणारा असून त्यामुळे आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिल्यास सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार देता येईल अशी भाजपची खेळी आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष देशमुख सामनेरमधून भाजपचे उमेदवार राहिले होते आणि अवघ्या 3 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या बाजूला 2014 मध्ये काटोलमधून आशिष देशमुख यांनीच अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यास अनिल देशमुख यांची कोंडी करता येईल असा भाजप श्रेष्ठींना वाटतंय आणि त्यामुळेच ते आशिष देशमुख यांना सावनेर किंवा काटोलमधून भाजपचा उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
आशिष देशमुखांना भाजपकडून सावनेरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता
आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार का, हे पाहावं लागेल.
हे ही वाचा :
[ad_2]