morning headlines breaking national state news live headlines bulletin morning 31th March 2024 india maharashtra latest update marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Rain Alert : वीकेंडला पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा मिळणार; या भागात पावसाची शक्यता

मुंबई : आज राज्यासह देशात पावसाची हजेरी (Rain Alert) पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, नव्याने सक्रीय होणाऱ्या वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर (Weather Update Today) परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. वाचा सविस्तर…

Mumbai Local MegaBlock : आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; असं आहे लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Mega Block Sunday : आज लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने आज रविवारी 31 मार्च  रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. वाचा सविस्तर…

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अवलंबली ‘मोदीनिती’, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उचललं ‘हे’ पाऊल 

Pakistan News : सध्या आपल्या शेजारचा देश पाकिस्तान (Pakistan) मोठ्या आर्थिक संकटात (economic crisis) सापडला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ ( Nawaz Sharif) या स्थितीतीन पाकिस्तानला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. देशाची आर्थिक स्थिती बदलण्याचे वचन त्यांनी पाकिस्तानातील जनतेला दिले आहे. यासाठी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची निती अवलंबणार आहेत. वाचा सविस्तर…

धक्कादायक! गुप्तांगात मिरची टाकून मजुरास मारहाण, चार दिवस डांबून ठेवलं; लातूर जिल्ह्यातील घटना

Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, गुप्तांगात मिरची टाकून एका मजुरास बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात देखील पोलिसांकडून कोणतेही कारवाई करण्यात येत नव्हती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Social Media Video Viral) झाल्यावर आणि भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे. वाचा सविस्तर…

Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार? अथियाच्या प्रेग्नंसीबाबत स्वत:च दिली मोठी अपडेट, ‘पुढच्या वेळेस…’

Athiya Shetty Pregnant : सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि तिचा क्रिकेटर पती केएल राहुल (KL Rahul) लग्नानंतर खूप एन्जॉय करत आहेत. चार वर्षांच्या डेटिंगनंतर केएल राहुलने 23 जानेवारी 2023 अथिया शेट्टीशी लग्न केले.दोघांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं असून त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  याबाबत थेट अथियाचे वडिल आणि अभिनेते सुनील शेट्टीने एक मोठी अपडेट दिली आहे. वाचा सविस्तर…

DC vs CSK Dream11 Prediction : शिवम दुबे की डेविड वॉर्नर…तुमचा कर्णधार कोण? पाहा 11 खेळाडूंची टीम, तुम्हाला करेल मालामाल

DC vs CSK Dream11 Prediction : ऋषभ पंतचा दिल्ली आणि ऋतुराज गायकवाड याचा चेन्नई संघ आज आमनेसामने असतील. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता विशाखापट्टनम येथे सामन्याला सुरुवात होणार आहे. आजचा हा सामना अतिशय रंगतदार होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

Horoscope Today 31 March 2024 : आजचा दिवस मेष, कुंभ राशींसाठी वरदानाप्रमाणे; तर ‘या’ राशींना बसणार आर्थिक फटका, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 31 March 2024 : आजचा रविवार काही राशींसाठी अतिशय शुभ ठरेल, तर काही राशीच्या लोकांना आज अडचणींचा सामना करावा लागेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार कसा राहील? आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर…

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts