arvind kejriwal 14 days judicial custody Aap Leader kejriwal want to read three books on how prime ministers decides along with ramayana and bhagwad geeta seeks permission in tihar jail from court marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी तीन पुस्तकांसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Arvind Kejriwal in Judicial Custody) सुनावण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी जेलमध्ये पुस्तक वाचण्याची परवानगी देण्यासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे. 

केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

अरविंद केजरीवाल यांची 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ईडीने (ED) न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांनी तीन पुस्तके हवी असल्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी मागितलेल्या तीन पुस्तकांमधील एक पुस्तक खास आहे. पंतप्रधानांवरील एका पुस्तकाचीही केजरीवाल यांनी मागणी केली आहे.

केजरीवालांची रवानगी तिहार जेलमध्ये

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती आणि 28 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीने पुन्हा कोठडी मागितली असता न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली होती. आता सोमवारी न्यायालयाने केजरीवालांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

केजरीवालांनी तीन पुस्तकांसाठी न्यायालयाची परवानगी मागितली

अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी आता 15 दिवसांसाठी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. ईडीने केजरीवाल यांना कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे.त्यानंतर सोमवारी न्यायालयाने याप्रकरणी सुनावणीत केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

केजरीवालांकडून या तीन पुस्तकांची मागणी

न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी वकिलाकडून कोठडीत पुस्तके, औषधे, स्पेशल डाएट आणि खुर्ची देण्यासाठी अर्ज केला आहे. केजरीवाल यांनी जेलमध्ये तीन पुस्तके घेऊन जाण्यासाठी मागणी केली आहे. केजरीवाल यांनी भगवदगीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डीसाईड ही तीन पुस्तके वाचण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी अर्ज केला आहे. यामध्ये पत्रकार नीरजा चौधरी लिखित पुस्तक प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक खास आहे. दरम्यान, न्यायालयाने अद्याप याबाबत परवानगी दिलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts