Narendra Modi Roadshow In Jabalpur MP stage collapsed more than 10 injured video lok sabha election marathi update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोनंततर (PM Modi Roadshow In Jabalpur) मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. मोदींच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आणि  बनवलेले तीन स्टेज कोसळले आणि त्यामध्ये 10 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. 

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जबलपूरमध्ये रोड शो केला. हा रोड शो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोकांच्या प्रचंड गर्दीत त्या ठिकाणी अससेलं स्टेज कोसळल्याने त्यात 10 हून अधिक लोक जखमी झाले. पंतप्रधानांना पाहण्यासाठी त्या ठिकाणच्या स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

 

पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर जबलपूरमध्ये आयोजित केलेल्या रोड शोचे फोटो शेअर केले आहेत. ते म्हणाले की, ‘आज जबलपूरमधला रोड शो खूपच अप्रतिम होता. येथील माझ्या कुटुंबातील सदस्यांचा उत्साह आणि जोश हेच सांगत आहे की आम्हाला तिसऱ्यांदा बहुमत मिळणार आहे. चांगल्या पायाभूत सुविधा आणि रस्त्यांसोबतच आम्ही प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व काम केले आहे. यामुळे जबलपूरच्या विकासाला नवे पंख मिळाले आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान म्हणाले की, जबलपूरमधील माझ्या कुटुंबीयांनी काँग्रेसचे जनविरोधी राजकारण दीर्घकाळ पाहिले आहे. आमचा पक्ष संसदेतही जबलपूरच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलला आहे. आगामी काळातही या संपूर्ण परिसराच्या विकासात कोणतीही कसर सोडणार नाही.

येत्या पाच वर्षांतही जबलपूरचा विकास पूर्ण गतीने आणि मोठ्या प्रमाणावर होईल याची आम्ही खात्री करू असे पंतप्रधान म्हणाले. आम्ही एमएसएमई, शहरी पायाभूत सुविधा आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देत राहू जेणेकरून या प्रदेशाची अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. जबलपूरच्या लोकांचे जीवन सुसह्य करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न असेल.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून नेत्यांची एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरीही सुरू आहे. एकीकडे भाजपचे सर्वच बडे नेते वेगवान रॅली आणि रोड शो करत आहेत, तर दुसरीकडे विरोधी आघाडीचे नेतेही वेगवेगळ्या दौऱ्यांमधून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts