Kanyadaan not essential under Hindu marriage act saptapadi is says Allahabad high court marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : हिंदू धर्मात विवाहाला (Hindu Marriage) पवित्र स्थान आहे. हिंदू विवाहामध्ये कन्यादान (Kanyadaan), सप्तपदी (Saptapadi) यांचा समावेश असतो. दरम्यान, हिंदू विवाहामध्ये कन्यादान करण्याची गरज नसते, मात्र सप्तपदी (Saptapadi) आवश्यक विधी आहे, असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना म्हटलं आहे की, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत (Hindu Marriage Act) सप्तपदीची (Saat Phere) आवश्यकता असते, कन्यादानाची आवश्यकता नसते. अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) ही महत्त्वाची टिपण्णी केली आहे.

हिंदू विवाहामध्ये कन्यादान आवश्यक नाही

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान हे सांगितलं आहे. लखनौ खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी दरम्यान सांगितलं की, हिंदू विवाहामध्ये फक्त फक्त सप्तपदी एक महत्त्वाचा विधी आहे, कन्यादान नाही. आशुतोष यादव या याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.

हिंदू विवाहात सप्तपदी आवश्यक : हायकोर्ट

लखनौ खंडपीठाने याचिकाकर्ता आशुतोष यादव यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, हा महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एक पीठाने या प्रकरणावर भाष्य करताना, उच्च न्यायालयाने खटल्यातील साक्षीदारांना बोलावण्याची याचिका फेटाळली आहे. विवाह संपन्न होण्यासाठी कन्यादान विधी आवश्यक नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

हायकोर्टाने याचिका फेटाळली

न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या एकल खंडपीठाने सांगितलं की, हिंदू विवाह कायद्यानुसार, फक्त सप्तपदी हा हिंदू विवाहाचा अत्यावश्यक विधी आणि सोहळा मानला जातो. हिंदू विवाह सोहळ्यासाठी कन्यादान विधी आवश्यक असल्याने तरतूद हिंदू विवाह कायदा करत नाही. या टिप्पणीसह, न्यायालयाने साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याची पुनर्विचार याचिका फेटाळली.

हिंदू विवाह कायदा काय सांगतो?

हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह सोहळ्यासाठी ‘कन्यादान’ आवश्यक नसल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. ‘सात फेरे’ यासाठी फक्त ‘सप्तपदी’ हा संस्कृत  शब्द आहे. हिंदू विवाह कायद्या अंतर्गत, सत्पपदी हाच अत्यावश्यक विधी आहे, असे निरीक्षण लखनौ उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने आशुतोष यादव यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना नोंदवलं आहे.

पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली

या प्रकरणात, लखनौच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या आशुतोष यादव नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या खटल्यात दोन साक्षीदारांना बोलावण्यासाठी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या विवाह प्रमाणपत्रात हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह सोहळा पार पडला होता, त्यानुसार कन्यादान हा अत्यावश्यक विधी आहे, असा उल्लेख करत चिकाकर्त्याचा दावा नोंदवला होता. यावेळी न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिपण्णी केली आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts