Mayawati Brother Got 261 Flats In 46 Percent Discount Noida Logix Infratech

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

UP News: बहुजन समाज पक्षाच्या (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांच्या भावाला आणि भावाच्या पत्नीला डिस्काऊंटमध्ये विकण्यात आले आहेत. रिअल इस्टेट फर्म लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडने  (Logix Infratech Private Ltd) विकसित केलेल्या नोएडा (Noida) अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील तब्बल 261 फ्लॅट  सवलत देऊन  डिस्काऊंट) देऊन देण्यात आले आहे. 

मायावती आणि त्यांच्या भावाला नोएडामध्ये 261 फ्लॅट  46 टक्के डिस्काऊंटमध्ये विकण्यात आले आहे. हे फ्लॅट ऑडिट रिपोर्टमध्ये अंडरव्हॅल्युएशन दाखवण्यात आले आहे.  अहवालात Logix Infratech Pvt Ltd च्या स्थापनेपासून ते दिवाळखोरी होईपर्यंत 12 वर्षांच्या रेकॉर्डचे परीक्षण केले आहे. कंपनीच्या कागदपत्रांच्या 2023 च्या फॉरेन्सिक ऑडिटचा अहवालही तपासण्यात आला आहे.

दोन लाख चौरस फुटांसाठी 2,300 रुपये प्रति चौरस फूट दराने करार

इंडियना एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, लॉजिक्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडची स्थापन 2010 साली झाली. 2007 साली मायावतींच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशात सरकार आले होते. कंपनीच्या स्थापनेनंतर दोन महिन्यांच्या आतच मायावती यांचे भाऊ आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र कला यांनी एक अॅग्रीमेंट केले होते. हे अॅग्रीमेंट नोएडाच्या ब्लॉसम ग्रीन्स प्रकल्पाचे आहे. अॅग्रीमेटमध्ये दोन लाख चौरस फुटांसाठी 2,300 रुपये प्रति चौरस फूट आणि 2,350 रुपये प्रति चौरस फूट  या दराने करार झाला होता.

2538 फ्लॅट्सपैकी 2329 फ्लॅटसची विक्री

या अहवालानुसार बसपाच्या अध्यक्षा मायवती  यांचा भाऊ आनंद कुमारला 46.02 कोटी आणि त्यांची पत्नी विचित्र लता 46.93 कोटी रुपयात खरेदी केले. त्यानंतर सप्टेंबर 2010 पर्यंत  कंपनीने नोएडाने 22 टॉवर डेव्हलप करण्यासाठी 22 एकर जमीन भाड्याने देण्यात आली होती. त्यानंतर या जमीनीवर 2022-23 पर्यंत कंपनीने 2538 फ्लॅट्सपैकी 2329 फ्लॅटसची विक्री करण्यात आली. तर दुसरीकडे कंपनीने आनंद कुमार आणि विचित्र कला यांना  28.24 कोटी रुपयांना 135 फ्लॅटस आणि 28.19 कोटीचे 126 फ्लॅटस एप्रिल 2016 साली देण्यात आले.

दिवाळखोरी कारवाईचे आदेश

Logix Infratech ला बांधकाम कंपनी अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स  लिमिटेड कडून 7.72 कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी करणारी पहिली नोटीस प्राप्त झाली. या कंपनीने 259.80 कोटी रुपयांच्या ब्लॉसम ग्रीन्ससाठी सिव्हिल आणि स्ट्रक्चरल कामे केली होती.  NCR मधील बांधकामावर बंदी आणि अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्सची थकबाकी भरण्यास असमर्थता दर्शवली. तसेच  कुशल कामगारांची कमतरता  असल्याचं कारण दिलं.त्यानंतर  NCLT ने Logix विरुद्ध दिवाळखोरी कारवाईचे आदेश दिले.

हे ही वाचा :

 

[ad_2]

Related posts