price of gold has increased by 13000 During the year Gudi Padwa Gold Price News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gudi Padwa Gold Price : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. दरम्यान, मागील वर्षीचा गुढीपाडवा (Gudi Padwa) ते यावर्षीचा गुढीपाडवा या वर्षभरात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीय. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात सोन्याच्या दरात 13 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  

आज गुढीपाडव्याचा सण आहे. यानिमित्त मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या खरेदीत वाढ झालीय. दर वाढूनही खरेदीत वाढ होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होते. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं कठीण झालं आहे. दरम्यान, गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक मोठी फायद्याची ठरत आहे. दरम्यान, वायदे बाजारात सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे. सध्या सोन्याचा दर हा 71700 रुपयांवर गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 13 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात सोन्याचे दर हे 58800 रुपये होते. मात्र, वर्षभरात 10 ग्रॅम सोन्यामागे 13 हजार रुपयांची वाढ झालीय.

सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याने गेल्या वर्षभरात 22 टक्के परतावा दिला आहे. हा मागील 10 वर्षातील सर्वोत्तम परतावा आहे. भू राजकीय स्थितीमुळं सोन्याच्या दरात वाढ होतेय. ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात अक्षय तृतीया येणार आहे. या काळातही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसरीकडे चीन मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. यामुळं देखील सोन्याच्या दरात वाढ होतेय. 

सोनं खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी

दरम्यान, आज गुढीपाडव्यामुळं सोन्याची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे जळगाव या ठिकाणी सोन्याची खरेदी करण्यासाठी दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोक होते. दरम्यान, पुण्यात सोन्याचा दर हा 66400 आहे तर वेढणीच्या सोन्याचा दर हा 71000 आहे. तर दुसरीकडं जळगावात देखील सोन्याच्या खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळालं. जळगावमध्ये सोन्याचा जीएसटीसह सोन्याचा दर हा 74000 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, काही ठिकाणी मात्र, सोने खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. वाढत्या दरामुळं सोनं खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळं नागरिकांना सोन्याची खरेदी करणं टाळलं आहे. अनेक ठिकाणी सोने व्यवसायिक खरेदीदारांची वाट पाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

महत्वाच्या बातम्या:

सोनं खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, आजचा दर 71000 रुपयांवर 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts