Maharashtra Weather Update Today IMD Rain Prediction likely to rain 10 to 14 April vidarbh marathwada madhya maharashtra monsoon marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. मार्चमध्ये उन्हाच्या झळा बसल्यानंतर मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. देशासह राज्यात रविवारपर्यंत पावसाचा (Rain Alert) अंदाज कायम आहे. देशात काही भागांना अवकाळी पावसाने (Rain Prediction) झोडपलं आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हेरावून गेला आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाने ढग दाटले असताना मुंबईसह किनारपट्टीभागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजही पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील. याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये  तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. मुंबईतील कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 22°C च्या आसपास असेल.

विदर्भात ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात येलो अलर्ट

परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला,  भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांना आयएएमडीकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर भारतीय हवामान विभागाने अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts