PM Narendra Modi To Hold Rally in Nagpur Today in Support of Ramtek Candidate Raju Parwe Lok Sabha Election 2024 Maharashtra Politicle Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Ramtek Sabha : नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज नागपूरच्या (Nagpur) कन्हानमध्ये (Kanhan) सभा होणार आहे. कन्हान नागपूर आणि भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या सीमेवर असल्यानं रामटेक (Ramtek), नागपूर आणि भंडारा गोंदिया (Bhandara-Gondiya) या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची (Lok Sabha Election 2024) ही मोदींची एकत्रित सभा असणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येनं लोक या सभेत येतील, असा महायुतीच्या नेत्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सभास्थळाची पाहणी केली. 

नरेंद्र मोदींच्या सभेवर पावसाची वक्रदृष्टी 

नागपूरच्या कन्हान येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट आहे. आज नागपूरसाठी नागपूर वेध शाळेनं ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. सभास्थळी डोम उभारले असल्याने विशेष फरक पडणार नसल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र नेमका सभेच्या वेळी पाऊस कोसळला तर तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोदींच्या सभेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. कन्हानमधील ब्रुक बाँड या बंद पडलेल्या चहा कंपनीच्या 18 एकराच्या आवारात ही सभा होणार असून पोलिसांनी मंगळवारपासूनच सभास्थानाचा पूर्ण ताबा आपल्याकडे घेतला आहे. 

रामटेक येथील सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातील कन्हान तालुक्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा येथे पार पडणार आहे. ही प्रचारसभा यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या तयारीचा तसेच उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आढावा घेतला. विदर्भात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं सभास्थळाला देखील या पावसाचा काही प्रमाणात फटका बसला. त्यामुळे पावसानं कितपत नुकसान झाले आहे आणि त्यात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कशी यशस्वी करता येईल? यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभास्थळाची पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतला. तसेच, सभेचं नियोजन करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते.

2019 मध्ये भाजपनं जिंकलेल्या 23 जागा 

महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत. महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर जागांच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे. या 48 लोकसभेच्या जागांवर पाच टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी भाजपनं 25 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 23 जागांवर विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts