Khagen Murmu bjp mp viral video Bengal bjp candidate kisses woman during campaign tmc Mamata Banerjee slams Lok Sabha Election marathi 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलकाता : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचार सुरू असून देशातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. त्यातल्या त्यात भाजप विरूद्ध ममता बॅनर्जी यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकारणाचा वेग आला आहे. त्यातच बंगालमधील भाजपच्या एका उमेदवाराने प्रचार करताना असं काही कृत्य केलं की त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपच्या खगेन मूर्मू (Khagen Murmu) हा उमेदवार प्रचारासाठी गेला असता त्याने एका महिलेचा मुका घेतला. यासंबंधीत तृणमूल काँग्रेसने त्याचा एक फोटो शेअर करत बाजपवर चांगलीच टीका केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो व्हायरल 

भाजपचे उत्तर माल्डा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खगेन मूर्मू यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Khagen Murmu Viral Video) होत आहे. सोमवारी ते श्रीहीपूर या गावात प्रचारासाठी गेले होते. त्यांचा प्रचाराचे फेसबुक लाईव्हही सुरू होतं. त्याचवेळी त्यांनी एका महिलेचा मुका घेतला. तृणमूल काँग्रेसने त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो शेअर केला आहे, तसेच भाजपवरही सडकून टीका केली आहे. 

 

तृणमूल काँग्रेसची टीका 

तृणमूल काँग्रेसने म्हटलंय की,  “आपण जे काही पाहतोय त्यावर आपला भरोसा नसेल तर आम्ही स्पष्ट करतो. भाजपचे खासदार आणि उत्तर माल्डाचे उमेदवार खगेन मूर्मू यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी एका महिलेचा जबरदस्तीने मुका घेतला. महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषण करणाऱ्या खासदारापासून ते बंगाली महिलेंवर अश्लील गाणी बनवणाऱ्या नेत्यांपर्यंत, भाजपमध्ये महिलांच्या विरोधात वागणाऱ्या नेत्यांची संख्या काही कमी नाही. या पद्धतीने महिलांच्या सन्मानामध्ये मोदींचा परिवार सक्रिय आहे. आता पु्न्हा हे जर सत्तेत आले तर काय करतील याचा विचार करा.”

यासंबंधित प्रतिक्रिया देताना खगेन मूर्मू यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. आपल्या राजकीय विरोधकांनी हा फोटो एडिट करून व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts