Railway Super App coming soon will provide all the facilities at one App Indian Railways News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Railways : रेल्वेचा प्रवास (Train journey) हा सर्वात आरामदायी आणि सुखकर समजला जातो. दररोज मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेनं प्रवास करतात. दरम्यान, रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आलीय. आता रेल्वे विभाग एक  ‘सुपर ॲप’ (super app) लॉन्च करणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या अॅपची गरज नसणार आहे. आता एकाच अॅपवर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय.  

 रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार

प्रत्येक समस्येसाठी स्वतंत्र अॅप असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता एकच सुपर अॅप येणार असल्यानं प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं अडचणी कमी होणार आहेत. या अॅपमध्ये एकाचे वेळी तुम्हाला तिकीटही बुंकींग करता येणार आहे आणि ट्रेन ट्रॅकिंगसारख्या गोष्टी करता येणार आहेत. दरम्यान, हे सर्व लोकसभा निवडणुकीच्यापुर्वी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच एखाद्या प्रवाशाला जर काढलेलं तिकीट रद्द करायचे असेल तर ती देखील सुविधा अधिक गतीमान करण्यात आलीय. फक्त 24 तासात तुम्हाला तुमचे पैस रिफंड होतील. 

भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय 

दरम्यान, भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय अॅप आहे. जवळपास 10 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. याचबरोबर Rail Madad, UTS, Satark, TMS Nirikshan, IRCTC एअर आणि पोर्ट रीड यासारखी इतर अनेक ॲप्स देखील कार्यरत आहेत. मात्र, आता प्रवाशांना वेगवेगळी अॅप वापरावी लागणार नाहीत रेल्वेच्या नवीन सुपर अॅपमध्ये सर्व माहिती मिळेल. 

महत्वाच्या बातम्या:

वेटींग की रिग्रेट… रेल्वे तिकिटांची कटकट मिटणार; AI टूल तिकीट बुक करुन देणार; काय असेल प्रोसेस?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts