Ayodhya Ram Mandir Ram Navami first Ram Navami after construction of Ram temple special festival for Ram devotees UP marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत (Ayodhya) भव्य-दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा संपन्न झाला, त्याला आता तीन महिने उलटले आणि अशातच आता रामनवमीची चाहुल लागली आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी (Ram Navami) आहे. त्यामुळे, या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. 

भव्य राम मंदिर निर्माणानंतरची पहिलीच रामनवमी

रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा, रंगबरिरंगी फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी रोषणाई, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आसमंत, तेवत असलेल्या लाखो पणत्यांच्या प्रकाशाने सजीवपणा पांघरलेला शरयूतीर, मनमोहक फुलांच्या सजावटीने सजून बसलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत अन् रामनामात चिंब भिजलेली लाखो रामभक्तांची मांदियाळी. 

रामभक्तांसाठी विलक्षण पर्वणी

22 जानेवारी 2024 रोजी पुण्यपावन देवभूमीत अर्थात अयोध्यानगरीत डोळ्यांचं पारण फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. जगभरातील लाखो भविकांनी याचि देही, याचि डोळा पाहिला. अशाच, अगदी अशाच सोहळ्याची अनुभूती पुन्हा एकदा येणार आहे. येत्या रामनवमीला 17 एप्रिल 2014 रोजी तब्बल 500 वर्षांच्या वनवासानंतर रामलला भव्यदिव्य अशा मंदिरात विसावले. त्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी. 

यंदाची रामनवमी खास 

खरंतर रामनवमी आपण दरवर्षी भक्तिभावाने साजरी करतो. मात्र यंदाची रामनवमी खास असणार आहे. कारण, रामलला मंदिरात विराजमान झाल्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी. त्यासाठी खास तयारीही करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या अभिजीत अभिजित मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे. त्यासाठीची ट्रायलही करण्यात आली आहे.

जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल

प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी प्रचंड उत्साहात साजरी होणार आहे. म्हणूनच, सात्विकतेचा हा महन्मंगल सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत धावून येणार आहेत.

रामनवमीला अयोध्या नगरी फुलणार

  • अयोध्येत तब्बल 50 लाख भाविक येण्याची शक्यता
  • भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
  • भाविकांच्या निवास, भोजनासाठी खास सुविधा असणार
  • भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी
  • परदेशी भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार
  • सुरक्षेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथकं तैनात असणार
  • शरयू नदीत सहा फायबर बोट तैनात 

रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी

जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी असणार आहे. मर्यादा, संस्कती, परंपरा, सात्विकता, संयम  आणि शौर्याचा अवतार असलेल्या प्रभू रामाच्या जन्माचा अर्थात रामनवमीचा हा सोहळा 
अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे. त्यामुळे, प्रभू रामाच्या भक्तीच्या आनंद लहरींनी भवताल व्यापून जाणार आहे, एवढं नक्की.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts