increased heat due to humidity and extreme temperatures chance of rain in pune in two three day

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून (Pune Weather Update)   चांगलाच उकाडा जाणवत आहे. या उकाड्यामुळे दुपारी रस्त्यांवर काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत आहे. पुढील दोन दिवस पुण्यात पवासाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात दमट वातावरण आहे. पुण्यात साधारण तापमान 39 अंशाच्या घरात आहे.

मागील 13 वर्षांची आकडेवारी पाहिली तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमान 2019 मध्ये होतं. साधारण 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र पुण्यात यंदा तापमान 39 अंशाच्या पुढे गेलं नाही आहे. त्यामुळे काहीसा दिलासा आहे. मात्र मे महिन्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साधारण तापमान 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मे महिन्यात पुणेकरांना उन्हाच्या झळा जाणवू शकतात. 

‘अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे गुजरातमार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत, त्यामुळे शहराला सध्या दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. काळजी न घेतल्यास हे वातावरण आरोग्यास घातक ठरू शकते. जेव्हा कमाल तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअस असते तेव्हा उष्णतेची लाट असल्याचे म्हटले जाते. पुण्यात सध्या तरी तशी लाट नाही, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता 

राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने  धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील 24 तासात  विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. या वीकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम आहे.राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Rain Forecast : वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Pune Crime News : मॅट्रिमोनियल साईटवरुन लग्न जुळवायला गेली अन् 40 लाख गमवून बसली; पुण्यातील तरुणीसोबत नक्की काय घडलं?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts