Indian Air Forces C 17 Globemaster Stuck At Leh Airport Due To Technical Failure Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

C-17 Globemaster Stuck At Leh Runway: भारतीय हवाई दलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान मंगळवारी (16 मे) काही तांत्रिक बिघाडामुळे लेह विमानतळाच्या धावपट्टीवर अडकलं. त्यामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, सी-17 हेवी लिफ्ट वाहतूक विमान सेवाक्षमतेच्या समस्यांना तोंड देत आहे आणि लेहमधील धावपट्टीवर आहे. समस्या सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, आज (17 मे) सकाळपर्यंत रनवे इतर उड्डाणासाठी उपलब्ध होईल.

एएनआयनं भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं माहिती दिली की, हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर विमान लेहच्या धावपट्टीवर अडकले आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सी-17 ग्लोबमास्टरमुळे रनवे ब्लॉक झाला आणि त्यामुळे येथे विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग करता आलं नाही.

news reels Reels

सी-17 ग्लोबमास्टर विमानामुळे रनवे ब्लॉक 

कुशोक बकुला रिनपोछे विमानतळावर C-17 ग्लोबमास्टर विमानामुळे, रनवे संपूर्ण दिवस ब्लॉक करण्यात आला आहे आणि या काळात कोणतंही टेक ऑफ किंवा लँडिंग होऊ शकलं नाही. त्यामुळे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मंगळवारी लेह विमानतळाच्या वतीनं ट्वीट करून माहिती देण्यात आली की, “विमानतळावरील जवळपास सर्व उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहेत.” संबंधित एजन्सी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि 17 मे पर्यंत वेळापत्रकानुसार उड्डाणं सुरळीत करण्यासाठी काम करत आहेत. वेळोवेळी परिस्थितीनुसार पुढील अपडेट्स शेअर केले जातील.” 

ट्विटरवर प्रवाशांचा संताप  

काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या समस्या सांगितल्या आहेत. एअर इंडियाला टॅग करत एका यूजरनं लिहिलं आहे की, “16 मे रोजी माझं लेह ते चंदीगडचं फ्लाइट रनवेवरील IAF च्या तांत्रिक समस्येमुळं रद्द करण्यात आलं. विमानतळावर मला सांगण्यात आलं की, आज अतिरिक्त फ्लाइट उपलब्ध करून दिली जाईल. आता कस्टमर केयर सांगत आहे की, 23 मेपर्यंत कोणतीही फ्लाइट उपलब्ध नाही.

दुसर्‍या एका युजरनं तक्रार केली आहे की, त्याचं फ्लाइट रद्द झालं आणि त्याला कोणताही परतावा मिळाला नाही. एका प्रवाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये लेहला जाणारं त्यांचं विमान रद्द झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची गर्दी दिसतेय.  

दिल्ली विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांनी सांगितलं की, इंडिगोनं लेहला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत. इंडिगो ना आज लेहला घेऊन जायला तयार ना नुकसान भरपाई द्यायला तयार. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांनी या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ट्विटरवर त्यांच्या प्रवाशांशी संपर्क साधला आहे.



[ad_2]

Related posts