pm narendra modi says Dr Babasaheb Ambedkar will also not able to change constitution rajasthan barmer rally bjp candidate kailash chaudhary Lok Sabha Election 2024 Campaign rajasthan barmer marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राजस्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. मोदी सरकार संविधान संपवण्याचा प्रयत्न करतंय, या विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. राजस्थानच्या बारमेरमधील एका प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी भाषणात हे वक्तव्य केलं आहे.

‘बाबासाहेब स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत’

जिथे संविधानाचा विषय येतो, तेव्हा लक्षात ठेवा, मोदीचा शब्द लिहून ठेवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाही. भारताचं संविधान सरकारसाठी गीता, रामायण, बायबल, कुराण आहे. आपलं संविधान आपल्यासाठी हे सर्व आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींची प्रचार सभा चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजस्थानमधील बारमेर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. येथे दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपचे कैलाश चौधरी बारमेर-जैसलमेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वत: आले तरी संविधान संपवू शकत नाहीत, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यामुळे ही सभा चर्चेत आली आहे. 

मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजस्थानमधील बारमेर येथे एका जाहीर सभेला संबोधित केलं. येथे दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपचे कैलाश चौधरी बारमेर-जैसलमेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधांन मोदींची भव्य सभा पार पडली, यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

एससी-एसटी आणि ओबीसी यांच्यावर अनेक दशके भेदभाव करणारी काँग्रेस आता जुनं रेकॉर्डर वाजवत आहे. ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना निवडणुकीत त्यांचा पराभव केला, ज्या काँग्रेसने आणीबाणी लावून देशाचं संविधान संपवण्याचा प्रयत्न केला, तीच काँग्रेस मोदींवर संविधान बदलणार असल्याचा खोटे आरोप करत आहेत, असंही मोदींनी  यावेळी म्हटलं आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts