Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 17th May 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

1. DRDO संचालक कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट होणार? महाराष्ट्र एटीएसनं पुणे सेशन्स कोर्टाकडे परवानगी मागितली

Maharashtra News: भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना (Pakistani Intelligence Agency) देणारे डीआरडीओचे (DRDO) संचालक प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांची पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्याची मागणी महाराष्ट्र एटीएसनं (Maharashtra ATS) केली आहे. महाराष्ट्र एटीएसनं मंगळवारी पुणे सेशन कोर्टात एक अर्ज दाखल करुन ही मागणी केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेराला नक्की काय-काय सांगितलं आहे, त्यांच्याशी किती लोक संपर्कात होते,पैशांची देवाणघेवाणही झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पॉलिग्राफ टेस्टमधून मिळेल, असं एटीएसला वाटतंय. दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) कडून कथितपणे हनी ट्रॅपिंग केल्यानंतर गोपनीय माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

2. Modi Govt 9th Anniversary: मोदी सरकारची 9 वर्ष; भाजपकडून मेगाप्लानिंग, जय्यत तयारी सुरू

Modi Govt Ninth Anniversary Celebrations: येत्या काही दिवसांतच मोदी सरकार (Modi Government) आपल्या कारकीर्दीची 9 वर्ष पूर्ण करणार आहे. यानिमित्त भाजपकडून (BJP) देशभरात जंगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपनं मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या आयोजनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची रॅली, भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या 51 जाहीर सभा आणि नामवंत व्यक्तींशी संपर्क, तसेच एक लाख कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन भाजपकडून केलं जात आहे. वाचा सविस्तर 

3. CBSE Board Exam 2024 Date: CBSE बोर्ड दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी होणार पुढल्या वर्षाच्या परीक्षा

CBSE Board Exam 2024 date Announced: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी (CBSE Board 10th Exam) आणि सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा (CBSE Board 12th Exam) पुढील वर्षी 15 फेब्रुवारीपासून होणार आहेत. CBSE इयत्ता दहावी आणि CBSE इयत्ता बारावीची डेटशीट बोर्डाकडून नंतर प्रसिद्ध केली जाईल. गेल्या शुक्रवारी CBSE दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. निकालाची अधिसूचना जारी करताना, CBSE बोर्डाकडून सांगण्यात आलं की, “बोर्डानं 2024 च्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून घेण्याचा निर्णय घेतला आहे.” परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जाऊन परिपत्रक पाहू शकतात. वाचा सविस्तर 

4. Maharashtra Nagpur Crime: आमदारांना फोन करुन मंत्रिपद देतो म्हणून सांगायचा अन् लाखो रुपये उकळायचा; आरोपी अटकेत

Maharashtra Nagpur Crime: महाराष्ट्रातील (Maharashtra Crime) काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गुजरातच्या (Gujrat News) मोरबीमधून (Morbi) अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांच्या नावाचा गैरवापर करत होता. वाचा सविस्तर

news reels Reels

5. IAF C-17 Globemaster: लेह विमानतळाच्या रनवेवर वायुसेनेचं सी-17 ग्लोबमास्टर विमान ठप्प; उड्डाणं रद्द, प्रवाशांचे हाल

C-17 Globemaster Stuck At Leh Runway: भारतीय हवाई दलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान मंगळवारी (16 मे) काही तांत्रिक बिघाडामुळे लेह विमानतळाच्या धावपट्टीवर अडकलं. त्यामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, सी-17 हेवी लिफ्ट वाहतूक विमान सेवाक्षमतेच्या समस्यांना तोंड देत आहे आणि लेहमधील धावपट्टीवर आहे. समस्या सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, आज (17 मे) सकाळपर्यंत रनवे इतर उड्डाणासाठी उपलब्ध होईल. वाचा सविस्तर 

6. 17th May In History: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना, इंग्रज आणि मराठ्यांमध्ये सालबाईचा तह; आज इतिहासात 

17th May In History: आजचा दिवस मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी पहिल्या अँग्लो- मराठा युद्धाचा शेवट झाला. मराठा आणि ईस्ट इंड्या कंपनीमध्ये सालबाईचा तह झाला. त्याचसोबत देवीची लस शोधून काढणाऱ्या डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मही आजचाच. जाणून घेऊया इतर महत्त्वाच्या घडामोडी… वाचा सविस्तर 

7. Horoscope Today 17 May 2023: मेष, मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

Horoscope Today, Daily Horoscope 17 May 2023: आज 17 मे 2023, राशीभविष्यानुसार बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या मिथुन राशीच्या लोकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. तर धनु राशीच्या लोकांच्या घरातील कलह दूर होतील. जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस कसा राहील त्याबाबत वाचा सविस्तर… 

[ad_2]

Related posts