Shash Rajyog is formed due to retrograde motion of Saturn 111 days zodiac sign will get a lot of benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shash Rajyog : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कोणता ना कोणता योग असतो. यामध्ये काही योग शुभ असतात तर काही अशुभ असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलानुसार राशीच्या लोकांच्या जीवनात योग आणि राजयोग तयार होतात. असाच आज रात्री शनिदेव कुंभ राशीत वक्री झाल्याने शश राजयोग निर्माण झाला आहे. 

आज रात्री म्हणजेच 17 जून 2023 पासून शनी कुंभ राशीमध्ये वक्री अवस्थेत गोचर करणार आहे. या गोचरमुळे शश राजयोगाचीही निर्मिती होणार आहे. दरम्यान या राजयोगाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. मात्र यावळी अशा काही राशी आहे, ज्यांना याचा सकारात्मक परिणाम मिळणार असल्याची माहिती आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कधी तयार होणार आहे हा राजयोग?

शनिवार 17 जून म्हणजेच आज शनिदेव कुंभ राशीत वक्री होणार आहेत. हे गोचर रात्री 10:48 वाजता होणार आहे. यामुळे शश राजयोग तयार होणार असून शनी 111 दिवस या अवस्थेत राहून 3 राशींना भरपूर लाभदायक ठरणार आहे. 

वृश्चिक रास

शनी वक्रीमुळे तयार होणारा शश राजयोग वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात नव्या आणि चांगला बदल घेऊन येणार आहेत. या काळात तुम्हाला मनाजोगी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला नक्कीच इतरांकडून आर्थिक मदत मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन आणि भरपूर पैसे मिळू शकणार आहे. 

सिंह रास

शनी वक्रीमुळे तयार होणारा शश राजयोगाचा परिणाम सिंह राशींच्या व्यक्तींना मिळणार आहे. यावेळी या राशींच्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे फायदा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येणार असून काही आर्थिक समस्या असतील तर त्या सुटणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळू शकणार आहे. तसंच हा राजयोग या राशींच्या स्त्रियांसाठी खास फायदेशीर असणार आहे. 

कुंभ रास

शनी वक्रीमुळे तयार होणारा शश राजयोग या राशींच्या व्यक्तींना आर्थिक फायदा देणार आहे. या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला नवी नोकरी मिळू शकणार आहे. इच्छा असल्यास तुम्ही परदेशी यात्रा देखील करू शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts