18th June In History On This Day Rani Laxmibai Death Anniversary International Picnic Day

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

18th June In History: आजच्या दिवशी इतिहासात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय सहल दिवस म्हणून साजरा केला जातो. तर, राणी लक्ष्मीबाई यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. तर पाहूया आजच्या दिवसाचे दिनविशेष.

आंतरराष्ट्रीय सहल दिवस (International Picnic Day) 

आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा फ्रान्स या देशात एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला होता. तेव्हापासून दरवर्षी 18 जून रोजी हा दिवस साजरा केला जात असतो. आंतरराष्ट्रीय सहल दिवस सगळयात प्रथम फ़्रान्स ह्याच देशात साजरा करण्यात आला होता. सध्याच्या काळात निसर्गाच्या सानिध्यात सहलीची मजा मित्र-परिवार आणि जवळच्या लोकांसोबत एखाद्या सुंदर आणि आरामदायी ठिकाणी जाऊन मजा केली जाते. पिकनिकला छोटीशी सहलही म्हणता येईल. यामध्ये खाद्यपदार्थ पॅक करून घरून नेले जातात. उद्यानात जमिनीवर चादर पसरून पिकनिकचा आनंद लुटला जातो.

1858: झाशीच्या राणीचा मृत्यू

झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. 18 जून 1858 रोजी इंग्रज स्वारांच्या तलवारीच्या लखलखत्या पात्यामुळं राणीचा मृत्यू झाला, त्या जागी आता स्मारक उभारण्यात आलं आहे. ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने आपल्या सैन्यासह 18 जून, 1858 साली सकाळीच ग्वाल्हेरवर हल्ला केला जिथे राणी लक्ष्मीबाई राहत होत्या. मात्र अशावेळी घाबरून न जाता, लक्ष्मीबाईंनी रणांगणामध्ये धाव घेतली आणि आपल्यासमोर येणाऱ्या इंग्रजांच्या सैन्याला तलवारीने सपासप कापत निघाली. लक्ष्मीबाईंकडे नवी सैन्याची तुकडी नव्हती. तर राणीचा जुना घोडा राजरतन युद्धात मारला गेला होता आणि त्यांचा नवा घोडा पुढे सरकायला तयरा नव्हता. त्यामुळे हे आपले अखेरचे युद्ध आहे याची जाणीव लक्ष्मीबाईंना त्याचवेळी झाली होती. मात्र हार न मानता राणी लढत राहिली. घोड्यावरून खाली कोसळून राणी युद्धात संपूर्णतः जखमी झाली होती. तर त्यांच्या डाव्या कुशीमध्येही तलवार घुसली होती. मात्र पुरूषी वेशात असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज ओळखू शकले नाहीत आणि अशा घायाळ अवस्थेत असणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यांच्या सैनिकाने मठात आणले. पण आपल्यावर उपचार व्हावेत अशी राणीची इच्छा नव्हती. तर आपला देह इंग्रजांच्या हाती लागू नये, ही त्यांची शेवटची इच्छा असल्याने त्यांच्या सेवकानेच त्यांना मुखाग्नी दिला असे सांगण्यात येते. ग्वाल्हेरमधील फुलबागमध्ये लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. झुंजार अशा या राणीमुळे नेहमीच प्रत्येक स्त्री ची नाही तर अगदी प्रत्येक भारतीयाचा मान आजही ताठ उभी राहाते आणि गर्वाने छाती फुलून येते. 

इतर महत्त्वाच्या घटना:

1576: मुघल शासक अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हळदी घाटीच्या युद्धाला सुरुवात झाली.

1776: महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.

1815: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.

1946: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजीतील एका रस्त्याला ’18 जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.

1994: युवा भारतीयह टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्मदिन.

2021: मिल्खा सिंग – द फ्लाइंग शीख, धावपटू – पद्मश्री (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)

[ad_2]

Related posts