Heavy Rains In Rajasthan Due To Cyclone Biparjoy

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) हे आता पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळामुळं बाडमेर आणि जालोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांपासून बाडमेरमध्ये (Barmer) पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काल रात्रीपासून बिपरजॉय वादळामुळं ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. खबरदारी म्हणून बाडमेर आणि जालोरमधील पाच हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं आहे. 

काल रात्रीपासून बखासरमध्ये सर्वप्रथम बिपरजॉयचा प्रभाव दिसून आला आहे. त्यानंतर शेवडा, बखासर, धनाळ, चौथण, धोरिमाण्णा येथे मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने शनिवारी (17 जून) बारमेर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. या पार्श्‍वभूमीवर एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासनाकडून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं

बाडमेर आणि जालोरमध्ये बिपरजॉय अधिक सक्रिय असल्यामुळे झोपडपट्टी आणि कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या 5 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रशासनाकडून एसडीआरएफ, लष्करासह विविध मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिपरजॉय वादळामुळे राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. 100 हून अधिक गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

या जिल्ह्यात मुसळधार पाऊस 

राज्यातील सिरोही, पाली, जैसलमेर आणि जोधपूर जिल्ह्यात चक्रीवादळ बिपरजॉयचा कमी प्रभाव दिसत आहे. मात्र, शुक्रवारी (१६ जून) दुपारपासून या भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. हा पाऊस शनिवारी (१७ जून)ही सुरूच होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या माउंट अबूमध्ये 210 मिमी, बाडमेरच्या सेवदामध्ये 136 मिमी, माउंट अबू तहसीलमध्ये 135 मिमी, जालोरच्या राणीवाडामध्ये 110 मिमी, चुरूच्या बिदासरामध्ये 76 मिमी, रेवदारमध्ये 68 मिमी, सांचोरेमध्ये 59 मिमी आणि पिनवर 5 मिमी पाऊस पडला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला मोठा फटका 

बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नऊ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान केलं आहे. येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या निशाण्यावर आता राजस्थान आहे. राजस्थानमधील प्रशासन सध्या अलर्टवर आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच शमणार आहे. यासोबत चक्रीवादळाचा परिणाम देशभरात होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे पाऊसही लांबला आहे. अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 4 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ 15 जून रोजी भारताच्या किनारपट्टीवर आदळलं. 

महत्त्वाच्या बातम्या:

Cyclone Biparjoy : बिपरजॉयचं संकट अद्याप टळलेलं नाही! वाळवंटात चक्रीवादळाचा कहर, मान्सूनही लांबला

[ad_2]

Related posts