[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
त्वचाविकार
ज्या व्यक्तींना त्वचाविकार असेल जसे की, खाज, खरूज, नायटा यासारख्या प्रकारांचा त्रास होत असेल तर वांग खाणं टाळा. महत्त्वाचं म्हणजे वांग्याची भाजी वारंवार खाल्ल्याने त्वचेला खाज येणे आणि त्वचाविकार वारंवार होतात.
पित्ताचा त्रास
पित्तांचा त्रास असलेल्या व्यक्तीने वांग्याला हातही लावू नये. वांग खाल्ल्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतो. तसेच अनेकांना वांग्याची भाजी खाल्ल्याने शरीरावर पित्त उठते. त्यामुळे हा त्रास होऊ नये म्हणून वांग टाळा.
दमा
दमा आणि अस्थमा सारखे आजार असणाऱ्यांनो वांग्याची भाजी अजिबात खाऊ नका. कारण वांग हे वातूळ आहे. यामुळे कोरडा खोकला, दमा, अस्थमाचा त्रास वाढण्याची दाट शक्यता असते. अशावेळी वांग टाळा.
मुतखड्याचा त्रास
ज्या व्यक्तींना किडनी स्टोन म्हणजे मुतखड्याचा त्रास असेल तर वांग पूर्णपणे खाणे टाळा. वांग्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात. याच वांग्याच्या बिया मुतखड्याचा त्रास वाढवण्यास कारणीभूत असते.
उष्णतेचा त्रास
ज्या व्यक्तींना उन्हाळ्याचा किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी वांग अजिबात खाऊ नका. कारण या वांग्यामुळे शरीरात उष्णता वाढते. वांग्याच्या अतिसेवनाने उष्णतेसंबंधीचे विकार मोठ्या प्रमाणात होतात. ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी वांग टाळा.
डायबिटिस
ज्या व्यक्तींना डायबिटिसचा त्रास आहे. त्यांनी देखील वांग टाळा. कारण वांग्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शरीरातील साखर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर वांग्याची भाजी अजिबात खाऊ नका.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]