[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कोणालाच सावरण्याची संधी मिळाली नाही. बाल्कनीत उभे असलेले सर्वजण खाली कोसळले. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे रहिवासीदेखील रथ यात्रा पाहण्यासाठी बाल्कनीत आले होते. तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनी कोसळल्यानं दुसऱ्या मजल्यावरील काही जण जखमी झाले. विटा, सिमेंट बांधकाम अचानक कोसळल्यानं काहींना गंभीर इजा झाली. या दुर्घटनेत १० ते १५ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अहमदाबादच्या दरियापूर काडिया नाका परिसरात असलेल्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. बाल्कनी कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १० ते १५ जण जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनी अंगावर पडल्यानं दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत उभे असलेल्यांनादेखील दुखापत झाली.
रथ यात्रा संपण्यासाठी काही किलोमीटरचं अंतर शिल्लक राहिलं असताना दुर्घटना घडली. जखमींमध्ये २ लहान मुलं, ३ महिला आणि ६ पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्यांची सुटका करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे.
[ad_2]