[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline) म्हणून ओळख असलेल्या लोकलमधून मुंबईकर रोज मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. लोकल म्हटले की सर्वांना आठवते ती गर्दी, धक्काबुक्की आणि लोकलमधील हाणामारी. पण लोकल ट्रेनमध्ये तुम्ही कधी योगा करताना पाहिला आहे का? नाही नाही मी फ्री स्टाईल योगा जो लोकल ट्रेनमध्ये होतो त्याबद्दल बोलत नाही आहे. मी बोलतेय ते योगासनांबद्दल…
आता तुम्ही म्हणाल एवढ्या गर्दीत योगा (International Yoga Day) कोण करतं? मलाच मुर्खात काढाल. पण मुंबईतील एक गृप लोकल ट्रेनमध्ये चक्क प्रवाशांना योगासाठी प्रोत्साहन देतोय. मी बोलत आहे हिल स्टेशन (Heal station) या गृपबद्दल.
खरंतर मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आणि विशेषत: ट्रेनच्या (Mumbai Local Train) गर्दीत असा योगा करता येईल, हा विचार देखील मनाला शिवला नसेल. पण हिल स्टेशनच्या गृपच्या रुचिता शहा यांना ही संकल्पना सुचली.
मी 2018 मध्ये पहाटे बोरिवली ते ग्रँट रोड असा प्रवास करायचे. प्रवासा दरम्यान मी ब-याचदा भजनं होताना, बायका स्वेटर विणताना, भाजी निवडताना अगदी सणासुदीला नाचताना देखील पाहिले आहे. मग म्हटले योगा देखील शक्य आहे. असाच विचार करून एकदा माझ्या ट्रेनमधील ग्रुपला लोकलमध्येच काही योगासने दाखवली. इथूनच माझ्या संकल्पनेचा पाया रचला गेला.
– रुचिता शहा, योगा ट्रेनर, healstation
लोकल (Mumbai Local) म्हटली की गर्दी आलीच. त्यामुळे योगा या गर्दत कसा काय शक्य आहे? माझ्या या प्रश्नावर त्या हसल्या आणि म्हणाल्या की, हाच एक गैरसमज आहे की योगा हा खाली बसून मॅटवरच केला जातो. पण असे काही नाही तुम्ही जसे बसले (Seating yoga) किंवा उभे आहात त्या जागी देखील काही हलकी फुलकी योगासने करू शकता. अशी योगासने करायलाही सोपी, कमी जागा लागणारी आणि बसल्या जागी किंवा उभे राहून करू शकणारी आहेत.
रुचिता यांनी त्यांचे गुरू डॉ. रक्षा वार्डिया यांचा सल्ला घेतल्यानंतर ट्रेनमधील योगा बद्दलची संकल्पना 2018 साली प्रत्यक्षात आणली. महिला दिन आणि योगा दिना दिवशी त्यांनी लोकल ट्रेनमध्ये योगाचा प्रचार करण्यास सुरुवात केली.
रुचिता आणि हिल स्टेशनचे इतर मेंबर प्रवाशांना हात, मान, मणक्याचे स्ट्रेचिंग आणि ध्यान अशा सोप्या गोष्टी शिकवतात ज्या जागेवर बसून किंवा उभे राहून करता येतात.
रुचिता यांच्याशी प्रेरीत होऊन अनेक महिला लोकल ट्रेनमध्ये बसल्या जागी योगा करतात. योगामुळे फ्रेश तर वाटेच आणि मनाला देखील शांती मिळते असा अनुभव कित्येक महिलांनी रुचिता यांच्याकडे बोलून दाखवला आहे.
सुरुवातीला रुचिता यांनी सुरू केलेल्या संकल्पनेत आता 100 हून अधिक योगा ट्रेनर जोडले गेले आहेत.
यावर्षी 21 जूनला होणाऱ्या योगा डे ला त्यांचा गृप लोकल ट्रेनसोबतच मेट्रो 1 आणि बेस्ट बसमध्ये देखील योगाचे सेशन्स घेणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते अंधेरी या 11.30 च्या आसपासच्या वेळेतील लोकलमध्ये योगा घेतला जाईल. त्यानंतर अंधेरी ते घाटकोपर असा मेट्रोमध्ये योगासने घेतली जातील. तसेच विक्रोळीवरून भायखळाच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये योगासने शिकवून योगाचा प्रचार होईल.
रुचिता सांगतात, यासाठी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट प्रशासनाकडून आवश्यक ती परवानगी घेतली जाते.
सुरुवातीला परवानगी मिळणे अवघड होते कारण रेल्वे अधिकारी विचारात पडले होते. छोट्या जागेत एका ट्रेनच्या डब्यात योगा कसा काय शक्य आहे. पण योगा छोट्या जागेत हा करता येतो हे समजवल्यावर ते तयार झाले.
-रुचिता शहा
ट्रॅव्हल टाईम, योगा टाईम, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. ब्रीदवाक्याला साजेल अशाप्रकारे, HealStation केवळ बेस्ट बसेस, ट्रेन आणि बोटींमध्ये ही जनजागृती सत्रे आयोजित करत नाही, तर वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये ट्रक ड्रायव्हर्ससाठी एक सत्र आयोजित केले होते.
रुचिता शाह म्हणतात, “आम्ही बोट, बेस्ट बस, माथेरान टॉय ट्रेन ( Matheran toy train) आणि अगदी सुरत इंटरसिटी ट्रेनमध्ये देखील योगा केला आहे.”
पश्चिम रेल्वे, मुंबईतील योग शिक्षक/प्रशिक्षक मिळून गेल्या 5 वर्षांपासून अशा प्रकारचे उपक्रम करत आहेत. मुंबईकरांचा थकवणारा ट्रेनचा प्रवास निरोगी, आनंदी आणि तणावमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे.
हेही वाचा
[ad_2]