ED Seizes 1 Crore 62 Lakh Rupees In 2000 Note Raids In Money Laundering Case; २ हजारांच्या नोटांचा खच, १००हून अधिक मालमत्तेचे पेपर्स अन्…; छापा टाकताच ED ही हादरली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी गुजरात, महाराष्ट्र आणि दमणमध्ये खंडणी, खून आणि दारू तस्करीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरुद्ध छापे मारताना १.६२ कोटी रुपये रोख जप्त केल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या नोटा २,००० रुपयांच्या होत्या. तपास एजन्सीने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सुरेश जगुभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गुजरातमधील दमण आणि वलसाड येथील नऊ निवासी आणि व्यावसायिक जागेवर छापे टाकण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश जगुभाई पटेल आणि त्यांचे सहकारी केतन पटेल, विपुल पटेल आणि मितेन पटेल हे २०१८ च्या दमणमधील एका दुहेरी हत्याकांडप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. तपास एजन्सीने सांगितल्यानुसार, पटेल आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात दडपशाही, गुजरात आणि मुंबईतील भ्रष्टाचार, बेकायदेशीर शस्त्रं जप्त करणं, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दारू तस्करी, दरोडा, सार्वजनिक सेवकांवर हल्ला आणि पासपोर्ट बनावटीचा खेळ असे आरोप करण्यात आले आहे. गंभीर म्हणजे त्यांच्या ३५ एफआयआरमधून हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

Maharashtra Monsoon: राज्यासाठी पुढचे ७२ तास अतिमहत्त्वाचे, रखडलेला मान्सून मुंबईसह ‘या’ भागांमध्ये बरसणार
यासंबंधी ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये १.६२ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले असून यापैकी १ कोटी रुपये २,०० रुपयांच्या नोटांमध्ये होते. तर १०० हून अधिक मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं आणि तीन बँक लॉकरच्या चाव्या तसेच कंपन्या, रोख व्यवहारांबद्दल संशयास्पद कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती ईडीने दिली आहे.

ईडीने केलेल्या आरोपानुसार, आरोपींनी कंपन्यांचे जाळे तयार केले होते आणि त्यापैकी बहुतेक एकतर कोणताही व्यवसाय करत नव्हते किंवा त्यांचा व्यवसाय फारच कमी होता. या कंपन्या स्थापन करण्याचा एकमेव उद्देश गुन्हेगारी कृत्यांमधून बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशाची लाँडरिंग करणे हा होता.

Crime News: आत्महत्या भासवत पत्नीचा गेम, पती अन् सासू-सासर्‍यांचा भयंकर कट; सुखी संसाराला असा लावला सुरूंग
फेडरल तपास एजन्सीला असं आढळून आलं की सुरेश पटेल, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये १०० कोटींहून अधिक रोख रक्कम जमा करण्यात आली होती. सुरेश पटेल हा गुजरातमध्ये दारू तस्करीच्या १० हून अधिक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, सात खोटे आणि फसवणूकीचे आठ गुन्हे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या ५ केसेस आणि भ्रष्टाचाराचा एक खटला असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

Mumbai News: मुंबईच्या दवाखान्यात पालिकेचं स्टिंग ऑपरेशन, डमी पेशंट पाठवला; सत्य पाहून अधिकारी हादरले…

[ad_2]

Related posts