Maharaharashtra Weather Update Is Weather Forecast Is Wrong When Will It Rain In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharaharashtra Weather Update : जून महिना संपत आला तरी अजून पावसाचा पत्ता (Maharaharashtra Weather Update ) नाही. हवामान विभागाने यावर्षी पावसाबाबत वर्तवलेले सगळेच अंदाज अक्षरश धुळीस मिळाले असल्याचं बोललं जात आहे. यामुळं राज्यातील सर्वच भागातील बळीराजा चिंतेत आहे तर शहरी भागात पाणीकपातीचं संकट उभं ठाकलं आहे. हवामान विभागाच्या अचूकतेवर यामुळं पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकतात का?, पुण्यात पाऊस कधी पडणार?,असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

पुण्यातील पावसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे, कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) नुसार, 25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 24 जून रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे.

Maharaharashtra Weather Update: मान्सूनसाठी तारीख पे तारीख…

हवामान विभागाने सुरुवातीला सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला. त्याचबरोबर मॉन्सून केरळात नेहमीप्रमाणेच 1 जूनला दाखल होईल असं सांगितलं. तर महाराष्ट्रात मॉन्सून 7 जूनला कोकणात पोहचेल आणि 9 जूनपर्यंत तो पुणे – मुंबईसह महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर मुंबई- पुण्यात मॉन्सूनच्या आगमनाची 16 जून ही नवीन तारीख सांगण्यात आली. त्यामध्येही पुढे बदल झाला आणि मॉन्सूनच्या आगमनाची 23 जून ही नवीन तारीख सांगण्यात आली.  मात्र मॉन्सून तळकोकणात यायलाच 9 जून उजाडला.

Maharaharashtra Weather Update : हवामान खात्याचे अंदाज चुकतात का?

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस पाडण्यास उशीर झाला. यावर्षी पाऊस पडायला उशीर होईल असा अंदाज आधीपासून वर्तवण्यात आला होता. पाऊस पडेल का? याचा अंदाज बांधण्यासाठी अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जातो. मात्र त्याचे अंदाज अचूक ठरत नाहीत. यासाठी अनेक कारण असतात. हवा, ढग असे अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे त्याचे अंदाज चुकतात असं थेट आपण म्हणू शकत नाही, असं मत हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा

Opposition Meeting : भाजपविरोधी पक्षांची पाटणात आज बैठक, देशातील बडे नेते उपस्थित राहणार; विरोधकांच्या घोषणेकडं देशाचं लक्ष 

 

[ad_2]

Related posts