[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सुरु असलेल्या या पावसामुळं मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्राच चांगला पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
दरम्यान, हवामान विभादानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे संपूर्ण भारतात 8 जुलैच्या आसपास मान्सून दाखल होतो. पण यावर्षी मात्र आधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
उत्तर भारतातही जोरदार पाऊस
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे. काही भागात पाणी साचलं आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये पावसानं जोरदार बँटिंग केली आहे. यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. सरासरीच्या उणे 46 टक्के कमी पावसाची नोंद झाल्याचं बघायला मिळत आहे. दुसरीकडं, राज्यात जून महिन्यात बिपरजॉय चक्रीवादळामुळं लांबलेला मान्सून दाखल होण्यास उशिर झाला. तेवढ्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात कमाल तापमानाची नोंद बघायला मिळाली. विदर्भात जून महिन्यातील 7 दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळाल्या. दरम्यान, या चालू जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण अनेक ठिकाणी पाऊस नसल्यामुळं शेतीचं कामं खोळंबली आहेत. पेरण्या रखडल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
[ad_2]